महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात लवकरच पिंक ऑटो रिक्षा सुविधा सुरु करणार-महिला,बालविकास मंत्री आदिती तटकरे 


तळा किशोर पितळे 

          राज्यातील महिलांचा प्रवास आणखी सुरक्षीत व्हावा, तसेच त्यांना रोजगारांची संधी मिळावी,यासाठी राज्यात लवकरच पिंक ऑटो रिक्षा सुविधा सुरु करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सुरुवातीला राज्यातील काही प्रमुख शहरांत ही सुविधा सुरु केली जाईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पिंक ऑटो रिक्षा पाहायला मिळतील.मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष बैठक पार पडली.या बैठकीत त्यांनी राज्यात पिंक ऑटो रिक्षा सुरु करण्याची माहिती दिली. आदिती तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की,राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व समावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करत आहे.तसेच जनतेच्या हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी अशा सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या.पिंक ऑटो रिक्षामध्ये महिलाच चालक आणि प्रवासी देखील महिलाच असतील ज्यामुळे महिलांना रोजगार मिळेल. याचबरोबर महिलांचाही प्रवासही सुरक्षित होईल.पिंकऑटो रिक्षा मुळे राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.याशिवाय,महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी सरकारच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड-निकष तपासून ही योजना यशस्वीपणे राज्यात राबवण्यात यावी, अशा ही सूचना आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog