धामणसई  गावामध्ये उभे राहिलेल्या हनुमान मंदिराचे ग्रामस्थांनी पावित्र्य राखा-आमदार अनिकेत तटकरे



रोहा दिनांक 17 मार्च (शरद जाधव)

              धामणसई येथे ग्रामस्थांच्या मागणी नुसार उभे राहिलेले हनुमान मंदिर सामाजिक सभागृह हे भव्य दिव्य स्वरूपात उभे राहिले असून ग्रामस्थ व तरुण वर्गांनी या मंदिराचे पावित्र्य राखा असे वक्तव्य आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.



धामणसई येथे हनुमान मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रमा ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की धामणसई  पंचक्रोशीला वारकरी परंपरा आहे या भागाला गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे, धोंडू महाराज कोल्हटकर, गुरुवर्य भाऊ महाराज निकम,यांच्या कृपा आशीर्वाद लाभले आहेत .त्यामुळे यापुढे येथील युवकांनी वारकरी परंपरा पुढे नेले पाहिजे. जुन्या पिढीने हा वारकरी संप्रदायाचा वारसा जपला आहे. पूर्वीचे कौलारू  मंदिरावर कळस चढला आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपत रोज मंदिरात हरिपाठ,भजन होऊ द्या असे मार्गदर्शन आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना केले. 

यावेळी सुमारे 17 लाख रुपये चा आमदार निधी अनिकेत तटकरे यांनी या मंदिराला मिळून दिल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी ह.भ.प. किरण महाराज कुंभार यांचे सुश्राव्य किर्तन झाले तर ज्या देणगीदाते यांनी मंदिराला सढ़लहस्ते मदत केली त्यांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.तर लोकापर्ण सोहळा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते रविवार दिनांक 17 रोजी होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog