रोहा कुणबी समाजाला लागले मोर्चाचे वेध,सानेगाव येथे महिला आक्रमक,मेढा विभागातून जोरदार प्रतिसाद,मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.



कोलाड (श्याम लोखंडे )

      कुणबी समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी शासनाने लादलेल्या १९६७ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे, ह्या प्रमुख मागणीसाठी 'रोहा तालुका कुणबी युवक मंडळ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचा लाक्षणिक आंदोलन मोर्चा गुरुवार दि.१४ डिसेंबर रोजी रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर सकाळी १०:३० वाजता धडकणार असून या मोर्चाची जनजागृती मोहीम जोरदार तालुक्यात गावोगावी जाऊन राबवली जात आहे.या मोहिमेला गावोगावी जोरदार प्रतिसाद मिळत असून महीलांचा देखील उत्सफूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने सदरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन जागोजागी मिळत आहे.तालुक्यातील मेढा विभागात सानेगाव येथे सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी झालेल्या सभेला गावातील कुणबी समाज बांधवानसह युवक, युवती,महिला देखील बहुसंख्येने उपस्थित होत्या.

           कुणबी दाखल्यासाठी समाजाचा रोहा तालुक्यातील सर्व भागांमध्ये मोर्चा संबंधी निमंत्रण जनजागृती मोहिमेचा झंझावात सुरु असून १४ डिसेंबर रोजी रोहा तालुक्यातील एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडणार असून यासाठी तालुक्यातील प्रमुख नेतेगण तसेच युवक मंडळाचे पदाधिकारी यासाठी तालुक्यातील विभागांतील ग्रुप मध्ये तसेच गावोगावी फिरून दाखला प्रश्नांवर जनजागृती करत आंदोलनाचे परिपत्रक वाटप करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे, ह्या प्रसुख मागणीसाठी तसेच शासनाकडून सन १९९० किंवा १९९५ असे पुरावे शिथिल करण्यात यावे यासाठी'रोहा तालुका कुणबी युवक मंडळ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन गुरुवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी ठिक १० :३० वाजता समाजातील प्रत्येक व्यक्तीला जातीचा दाखला मिळावा व त्याची जातपडताळणी व्हावी यासाठी आपण संघटीत प्रयत्न करणार आहोत यासाठी गरज आहे ती आपल्या एकीची जोपर्यंन आपल्याला जातीच्या दाखल्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आता मागे हटणार नाही असा निर्धार येथील कुणबी समाज बांधव यांनी केले आहे.

         यावेळी कुणबी समाज नेते तथा मुंबई कुणबी समाज संघाचे उपाध्यक्ष सुनिल ठाकूर यांनी उपस्थित कुणबी समाज नेतेगण व बांधव यांचे स्वागत करत जातीचा दाखला प्रश्न हा सुटलाच पाहिजे तो मिळत नसल्याने समाजात शैक्षणीक, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया आपण मागास राहीलो आहोत त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आम्हीं येथील समाज बांधव समाज्याशी ठाम राहू तसेच मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आश्वासन देऊन आपली भावना व्यक्त केली या सभेचे प्रास्तविक कुणबी युवक महेश बामुगडे यांनी केले तसेच रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक सुरेश मगर, रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे, उपाध्यक्ष शंकर भगत, तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog