रोहा (धगडवाडी) येथे अमृतधारा गोशाळेचे शंकराचार्य राघवेश्वर भारती यांच्या हस्ते उद्घघाटन

रोहा -दिनांक 16 डिसेंबर 

          रोहा तालुक्यातील सुतारवाडी परिसरातील धगडवाडी येथे दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी मा प्रतिष्ठान च्या वतीने अमृतधारा गोशाळेचे उद्धघाटन श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य राघवेश्वर भारती महास्वामी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी मा -- प्रतिष्ठानचे कृष्णा भट यांनी शंकराचार्य राघवेश्वर भारती महास्वामी यांचे जोरदार स्वागत केले महास्वामी गुरुजी हे प्रथमच आपल्या भक्तगणासाठी दर्शन देण्याकरता मुंबईत आले होते त्यामुळे धगडवाडी येथे भक्तजनांचा प्रचंड जन समुदाय जमला होता.

  मा - राष्ट् प्रतिष्ठान चे कृष्णा भट यांच्या भट फार्ममध्ये महास्वामी गुरुजी निवासस्थानी होते. त्या ठिकाणी आलेल्या भक्तगणा गुरुजींनी अनमोल असे मार्गदर्शन केले. कृष्णा भट हे गेली 15 ते 20 वर्ष ढोकळेवाडी येथे गोशाळा चालवीत आहेत . गाय हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे.अशा मातेचे रक्षण करणे हे हिंदूंचे काम आहे. हे काम गेले अनेक वर्ष कृष्णा भट मा- राष्ट्रा प्रतिष्ठानच्या वतीने निस्वार्थीपणे करीत आहेत.

मी करित असलेले सामाजिक काम हे आमचे मार्गदर्शक गुरुजी राघवेश्वर भारती यांच्या कृपाआशिर्वादातुन व त्यांच्या प्रेरणेतून होत असल्याचे मा -- प्रतिष्ठान चे कृष्णा भट यांनी सांगितले  गेली दोन दिवस मोठ्या उत्साहात व आनंदात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात स्थानिक नागरिक ग्रामस्थ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना कृष्णा भट यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog