आमदार अनिकेत तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश
पुगांव येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
कोलाड- शरद जाधव
रोहा तालुक्यातील पुगांव येथील शेतकऱ्यांचे गेली ५ वर्ष रखडलेले शेती नुकसान भरपाई चे पैसे मिळवून देण्यात कोकण विधानपरिषदेचे दमदार आमदार अनिकेत तटकरे व माजी पालकमंत्री व श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांना अखेर यश आले आहे.अर्थिक मंदिच्या काळात हि नुकसान भरपाई मिळवून दिल्याने दोन्ही आमदारांचे ग्रामस्थ विशेष आभार मानत आहेत.
डोळवहाळ बंधारामधून उजवा तीर कालव्याद्वारे आर. सी.एफ्. व इतर कंपन्यांना पाणी दिले जाते. यामध्ये कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे शेती सतत पाण्याखाली राहत असल्याने शेतकरी वर्गाचे खुप नुकसान होते. गेली अनेक वर्ष शेतीत पाणी असल्याने शेती सुद्धा नापिक झाली आहे.असे असताना संबंधीत कंपन्या तुटपुंजी नुकसान भरपाईही देण्यास सुध्दा कित्येक वर्ष टाळाटाळ करीत होत्या. सदर बाब ग्रामस्थ व युवा वर्गानी आमदार अनिकेत तटकरे व आदिती तटकरे यांच्या कानावर घालताच अधिकारी वर्गाशी ग्रामस्थांची भेट घडवून पाठपुरावा करण्यात आला.त्याचीच फलश्रृती म्हणून तब्बल १ कोटी २५ लाख रुपये एमआयडीसी मार्फत मिळवून दिले गेले.
मागील कालखंडात पुगांव गावातील बहुसंख्य तरुण वर्गाने कोलाड येथील भव्य जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दत्ताजीराव तटकरें पासून ते आज अनिकेत तटकरेपर्यंत तटकरेंचे राजकारण पुगाव गावांत टिकून आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास कोण जिंकला कोण हरला हा मुद्दा बाजूला ठेवून राष्ट्रवादीने का होईना प्रयत्न व पाठपुरावा करून पैसे आणले एवढे खरे अशी स्पष्ट प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमोद म्हसकर यांनी दिली.
Comments
Post a Comment