रोहा प्रेसक्लबची नुतन कार्यकारणी जाहिर
प्रेसक्लब रोहा तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांची निवड
रोहा-प्रतिनिधी
रोह्यातील सक्रिय पत्रकारांची समाजसेवी संस्था असलेल्या रोहा प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री.शशिकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मा.मिलिंदजी अष्टिवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता कुणबी भवन रोहा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या सभेमध्ये नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रेसक्लबचे पदाधिकारी म्हणून खालील सन्माननिय पत्रकारांची निवड करण्यात आली आहे.
तालुका अध्यक्षपदी श्री. राजेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे,राजेंद्र जाधव हे अनेक वर्षे रोहा तालुक्यात सक्रिय व डॕशिंग पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत.राजेंद्र जाधव यांनी "दैनिक रायगड टाइम्सचे " रोहा कार्यालय प्रमुख म्हणून आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक गरजुंना न्याय मिळवून दिला आहे.तसेच "सलाम रायगड " पोर्टल व युट्युब चॕनेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी मोठ्या निष्ठेने केले आहे.त्यांच्या प्रेसक्लब रोहा व पत्रकारिकेतील योगदानाची दखल घेऊन रोहा तालुका अध्यक्षपदी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे जेष्ठ पत्रकार श्री .सुहास खरीवले यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
रोहा तालुका उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार श्री.श्याम लोखंडे व श्री. नंदकुमार मरवडे सर यांची निवड करण्यात आली आहे.
सरचिटणीस म्हणून श्री.रविंद कान्हेकर,खजिनदार श्री.संदीप सरफळे,सहचिटणीस रविना मालुसरे-भोसले,सहखजिनदार - अंजुम शेटे,तालुका संपर्कप्रमुख ; सागर जैन,मुख्यसंघटक-विश्वजित लुमण सहसंघटक- कल्पेश पवार तालुका सहसंपर्कप्रमुख-जितेंद्र जाधव,प्रसिद्धीप्रमुख-केशव म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे.
तर कार्यकारिणी सदस्यपदी जुगल दवे, समिधा अष्टीवकर,अमोल करळकर, अक्षय जाधव, उद्धव आव्हाड,दिप वायडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सल्लागारपदी जेष्ठ पत्रकार शशिकांत मोरे, अल्ताफ चोरडेकर, नरेश कुशवाह, महेश बामुगडे,पराग फुकणे, शरद जाधव.अरुण करंबे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रेस क्लब रोह्याच्या नुतन कार्यकारणीवर समाजातील सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment