वरसगांव येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आमदार अदितीताई तटकरे रंगल्या माऊलींच्या गजरामध्ये
खारी/ रोहा- केशव म्हस्के
रोहे तालुक्यातील मौजे वरसगांव येथील आराध्य ग्रामदैवत सापया देवस्थानच्या प्रंगणामध्ये आदिनाथ सेवा मंडळ,वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० वर्षांची परंपरा लाभलेला अखंडित व अविरतपणे चालू असलेल्या हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.यावेळी माजी मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा सदस्या आमदार कु.अदितीताई तटकरे यांनी हरिपाठ "ज्ञानोबा तुकोबांच्या" गजरामध्ये तल्लीन होत वारकरी भजनाचा ठेका धरला.
महाशिवरात्रीच्या पर्वणी योगाचे औचित्य साधत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आदिनाथ सेवा मंडळ वारकरी सांप्रदाय गुरुवर्य हभप. ब्रहमुर्ती जगन्नाथ महाराज गोसावी (लांजा) यांच्या मार्गदर्शनाने युवा कीर्तनकार हभप.अनिल मोहन सानप यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे गेली ३० वर्षांची परंपरा लाभलेला अखंडित व अविरतपणे चालू असलेल्या हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.शनिवार दि.१८ फेब्रुवारी ते शनिवार दि.२५ फेब्रुवारी २०२३ अखेर सप्ताहाचे निमित्ताने खांब, आंबेवाडी, महादेववाडी, कोलाड - वरसगांव,तळवली तर्फे दिवाळी पंचक्रोशी परिसरातील वारकरी सांप्रदाय मंडळ, भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत हरिनाम श्रवण सुखाचे लाभ घेत आहेत.
जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार समाज प्रबोधन करून संसारामध्ये गुंतलेल्या जीवाने परमार्थाकडे झोकून देत आपल्याला लाभलेल्या दुर्लभ अश्या नरदेहाचे/जीवनाचे सार्थक कल्याण करून घ्यावे "नर ऐसे करणी करे! तो नर का नारायण बने!!" असे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
हरिनाम सप्ताह प्रसंगी गुरूवार दि.२३ फेब्रुवारी सहाव्या दिवशी हरिनाम सप्ताह साजरा होत असताना माजी पालकमंत्री रोहा - माणगाव श्रीवर्धन विधानसभा सदस्या आमदार कु.अदिती तटकरे यांनी हरिपाठ ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये तल्लीन होत वारकरी भजनाचा ठेका धरत मनमुरादपणे आनंद आस्वाद घेतला.
कीर्तन सेवे दरम्यान आ.अनिकेत तटकरे यांच्या समवेत राकेश शिंदे,पंचायत समिती सदस्य सिद्धी संजय राजीवले, सरपंच विशाखा विजय राजीवले, ग्राम पंचायत सदस्या पुनम अजित आंब्रूस्कर,माजी सरपंच सुशील शिंदे,विजय बंड्या राजीवले,उपाध्यक्ष प्रभाकर सानप,सचिव अनंत आंब्रूस्कर,आदी सप्ताह कमिटी सदस्य ग्राम तरुण मित्र मंडळ,अशोक लहाने,पोलीस पाटील चंद्रकांत सानप यांनी मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत सत्कार करण्यात आले.
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी तेकरीता वरसगांव ग्रामस्थ,महिला बचत गट,विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींच्या सहकार्याने वारकरी सांप्रदाय मंडळ भाविक भक्तांच्या सहयोगाने तरुण युवक मंडळ अथक परिश्रम घेत आहेत.
Comments
Post a Comment