रोहे खारगांव येथे गावदेवी भवानी मातेचा वार्षिक पालखी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न
खारी/रोहा -केशव म्हस्के
रोहे तालुक्यातील मौजे खारगांव येथील आराध्य ग्रामदैवत गावदेवी भवानी मातेचा वार्षिक पालखी मिरवणूक सोहळा माघ शुद्ध एकादशी शके १९४४ दि.०१ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी मोठ्या थाटामाटात व जल्लोषमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी बुधवार रोजी खारगाव गावची ग्रामदैवत, नवसाला पावणारी हाकेला धावणारी गावदेवी भवानी मातेची वार्षिक पालखी मिरवणूक सोहोळयानिमित्ताने पहाटे अभिषेक धार्मिक पूजा विधी सायंकाळी पालखी मिरवणूक सोहोळयाप्रसंगी आरे पंचक्रोशी वारकरी सांप्रदायिक भजन - हरिपाठ,बेंजो पथक, ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक, खालू बाजाच्या साथीने व पारंपारीक पद्धतीने साजरा करीत संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक घरोघरी जात महिला मंडळ,अबालवृद्ध, बाळ गोपाळ,जेष्ठ नागरिक,तरुण मित्र मंडळ तसेच रोहा - चणेरा पंचक्रोशी परिसरातील तसेच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवत भाविक भक्तांनी आपल्या मित्र परिवारासमवेत भवानी मातेचे मनोभावे पूजा आरती करून दर्शन घेतले..
सदरील गावदेवी भवानी मातेची वार्षिक पालखी मिरवणूक सोहोळा यशस्वीतेसाठी गाव कमिटी,तरुण मित्र मंडळ,महिला मंडळ,युवती वर्गाने विशेष परिश्रम घेतले..
Comments
Post a Comment