सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचा उपक्रम;
"गाथा महाराष्ट्राची" सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत
तळा:संजय रिकामे
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व तळा तालुका राष्ट्वादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून गाथा महाराष्ट्राची लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तळा तालूक्यातील रसिक प्रेक्षकांसाठी गाथा महाराष्ट्राची आर्केस्ट्रा कार्यक्रम दि २० फेब्रु.आयोजीत केला होता.प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना पूष्पहार अर्पण करुन श्री.गणेशाचे पूजन, दिपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी आ.अनिकेत तटकरे आ.अदिती तटकरे नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे तालुका अध्यक्ष नाना भौड अॕड. उत्तम जाधव, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, महीला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे शहर अध्यक्षा मेघना सुतार माजी सभापती अक्षरा कदम,गिरणे सरपंचा ज्योती पायगुडे, दिग्दर्शक राकेश नाईक आर जे.अमित मंगेश शेट देशमुख राष्ट्वादी जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे निजामपूरचे बाबुशेठ खानविलकर.इंदापूर येथील अशोक जैन किशोर जैन,दिनेश जैन नगरसेवक, नगरसेविका सरपंच कार्यकर्ते तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठाने गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात कोविडच्या कारणामुळे सर्व कार्यक्रमावर बंदी आणली होती परंतु माजी पालकमंत्री अदिती तटकरे आणि आ.अनिकेत तटकरे यांच्या सौजन्याने तालुक्यामध्ये गाथा महाराष्ट्राची दिग्दर्शक राकेश नाईक शंभर कलाकारांसह लोकगीते, पोवाडा,नृत्य संगीत अशा विविध अदाकरीने आर्केस्ट्रा कार्यक्रम होत असून तळा तालुक्यासाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल या माध्यमातून दरवर्षी तटकरे कुटुंब हे तळा तालुक्याला सांस्कृतिक कार्यक्रम देऊन एक संघटन निर्माण करत असलेली भावना निर्माण होते. महाराष्ट्राचे लोककला यामधून महाराष्ट्राची हिंदू संस्कार, संस्कृती जपण्याचा हा एक वसा घेतला आहे.या माध्यमातून दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदीन, संत मालिका,संतांचा मेळा,स्वामी समर्थ,जय मल्हार,जिजाबाईंनी घोड्यावरून येणारी स्वारी, भालदार चोपदार,संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजानी चालवली भिंत, पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई अशा विविध कला कथा यामधुन सादर केल्या हे खरे आकर्षण ठरले.नेत्रदिपक विद्युत रोषणाई आसन व्यवस्थेमुळे रंगत आली होती.
या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व रसिक प्रेक्षकांनी लाभ घेतला जवळपास तीन हजार रसिक प्रेक्षकांना तीन तास खुर्चीवर खेळून ठेवणारा असा हा बहारदार कार्यक्रम झाला.
Comments
Post a Comment