रोहा पोलिसांची दमदार कामगिरी 

रेकाॕर्डवर असलेले कुख्यात गुन्हेगार गजाआड

रोहा-प्रतिनिधी

       रोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक श्री.प्रमोद बाबर साहेब व त्यांचे सहकारी यांनी अज्ञात गुन्हेगारा विरुध्द रोहा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 06/2023 भा.द.वि.कलम 454,380 हा गुन्हा दि. 20 जानेवारी रोजी  दाखल केला होता.पोलिस सदरच्या अज्ञात आरोपीचा शोध घेत होते.

    तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.उ.नि. साठे व टिम यांचेकडून चालू होता.

     तपासाचे दरम्यान PSI साठे आणि टीम यांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजचे मार्फतीने अज्ञात आरोपीतांचे फोटो निष्पन्न करून सदर आरोपीत हे शिर्डी व पुणे येथील राहणारे असल्याचे माहिती काढून सदर आरोपीतांना शिर्डी व पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

  सदर आरोपीतांकडे अधिक तपास करता त्यांनी अलिबाग व रसायनी पोलीस ठाण्याचे अंतर्गत देखील घरफोडीचे खालील गुन्हे केल्याची कबुली दिली दिली आहे.

आरोपीतांचे नाव व पत्ता-

1) नवनाथ साहेबराव गोरडे, वय 34 वर्षे रा. पोहेगाव, कोपरगाव जवळ, शिर्डी, जि. अहमदनगर.

2) अतुल चंद्रकांत आमले, वय - 29 वर्षे, रा. ठी. आकाशनगर, कर्वेरोड, पुणे. 

उघडकीस आलेले एकूण गुन्हे-

1) रोहा पो. ठाणे गुरनं. 06/2023 IPC 454, 380 .

2) रसायनी पो. ठाणे गुरनं. 13/2023, IPC. 457, 380 

3) अलिबाग पो. ठाणे गुरनं. 20/2023, IPC. 454, 457, 380 . 

गुन्हयातील जप्त मुद्देमाल

1)4,70,000/- रू. किंचे सोन्याचे 84 ग्रॅम वजनाचे दागिने,

2)10000 /- रु. किंचे चांदीचे दागिने 

3)50,000/- रुपये रोख रक्कम, 

4)आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेली

50,000 रु. किंची पल्सर 220 मो/सायकल

असा एकूण 5,80,000/- रु. किंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.( 98% of Stolen Property)

आरोपीतांचे पूर्वीचे रेकॉर्ड

नवनाथ गोरडे याच्यावर यापूर्वीचे सदोष मनुष्यवध, दरोडा, शस्त्र अधिनियम अन्वये एकूण 09 गुन्हे दाखल आहेत.

   तसेच आरोपी अतुल आमले याच्यावर दरोडा, चोरी, घरफोडीचे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. 

दरची कामगिरी पोउनि धनाजी साठे, पो.हवा/जितेंद्र चव्हाण, पो.हवा./विकास खैरनार, पो.ना. अक्षय जाधव, पो.शि./अक्षय सावंत, तसेच सायबर विभागाचे पो हवा / तुषार घरत व पो. शि. अक्षय पाटील यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog