रोहे वाशी शिववंदना वाचनालयाच्यावतीने शिवजयंती  थाटामाटात संपन्न.

किल्ले रायगडावरील मशालशिवज्योतीचे जल्लोषात स्वागत

खारी/रोहा -केशव म्हस्के

 रोहे तालुक्यातील मौजे वाशी येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवरायांच्या विचारांचे जाज्वल्य इतिहास,ऐतिहासिक गड किल्ल्यांचे संवर्धन बाबत प्रसार आणि प्रचार व्हावे या एकमेव उद्देशाने प्रेरित झालेल्या शिववंदना वाचनालय चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेमी तरुण युवक युवतींच्या नेतृत्वाने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील मशाल शिवज्योत प्रज्वलित करीत महाराजांच्या साक्षीने अभिवादन करून गावामध्ये शिवजयंती सोहोळा मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरण संपन्न करण्यात आला. 

        सालाबादप्रमाणे याहीवर्षी गेली ७ वर्षांची परंपरा अबाधित राखत रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिव विचारांची ज्वलंत शिवज्योत मशाल आणण्यासाठी आई कुलस्वामिनी जगदंब जय,भवानी माते की जय, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव गर्जना करीत संपूर्ण गावातील शिवप्रेमी तरुण युवक-युवती मोठ्या संख्येने राजधानी रायगडावर जातात. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्रपूर्वक अभिवादन करून मशाल शिवज्योत प्रज्वलित करीत महाराजांच्या साक्षीने महिला,ग्रामस्थ व शिवकन्या आनंदामध्ये शिवज्योतीचे ठिक ठिकाणी स्वागत करतात.

  रायगडावरून आणलेल्या शिवज्योत बाळ वृद्ध हातामध्ये घेत गावातून जल्लोषात आनंदात आणि उत्साहात आई कुलस्वामिनी जगदंब जय भवानी माते की जय, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव गर्जना देत संपूर्ण गाव महाराजांच्या जयघोषाने दुमदुमुन सोडतात सर्वत्र जल्लोषमय आनंददायी वातावरणामध्ये शिवज्योती  मिरवणूक काढण्यात आली.

      गावातील सात दांपत्यांच्या हस्ते अभिषेक व पूजन शिवरायांच्या मूर्ती चे धार्मिक पद्धतीने अभिषेक व विधीवत पूजा करण्यात आली. तर सायंकाळी शिववंदना आणि शिवज्योत भव्य मिरवणूक शिवज्योत प्रत्येकाच्या घरोघरी अगदी भक्ती भावाने पूजन करतात तद्नंतर महाप्रसाद त्यानंतर छत्रपती शिवरायांचे पाळणे,शिवरायांचा पराक्रमाचे पोवाडे आदी अध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून गावांतील शिवप्रेमी महिला वर्ग बालगोपाल अबालवृद्ध,जेष्ठ नागरिक तरुण युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

     सदरील शिवजयंती उत्सव दरम्यान माजी पालकमंत्री आ.अदिती तटकरे,रायगड जिल्हा सरचिटणीस तथा कुणबी समाज नेते सुरेश मगर,विद्यमान सरपंच,उपसरपंच अरविंद मगर, रोठ बुद्रुक सरपंच नितीन वारंगे, बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, लोकप्रतिनिधींसह, गड किल्ले अभ्यासक, सेवानिवृत्त फौजी,पंचक्रोशी परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींनी सदिच्छा भेटी दरम्यान शिववंदना वाचनालय आणि तरुणांनी पुढाकार घेत सातत्याने राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून मंडळास शुभेच्छा,प्रोत्साहन दिले.

Comments

Popular posts from this blog