संत विचारांच्या उजळणीने, रोह्यात संत रोहिदास जयंती साजरी
रोहा-प्रतिनिधी
रोहा तालुका चर्मकार समाजाच्यावतीने रोहा येथे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संत रोहिदासांच्या मौलिक विचारांची उजळणी करण्यात आली. या कार्यक्रमात संतवाणीच्या उजळणीने एक वेगळी ऊर्जा निर्मिती केली, तर संतांच्या मौलिक विचारांनी उपस्थित समाजबांधवांचे प्रबोधन झाले.
रोहा तालुका चर्मकार समाजातर्फे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे जिल्हा सरचिटणीस राकेश केळकर, रोहा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष दिपक आंबडकर, दिलीप पाबरेकर, रोहा तालुकाध्यक्ष समीर नागोठकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाले. यावेळी प्रमुख वक्ते राकेश केळकर, राजेंद्र जाधव यांनी संताचे विचार मांडले, संतवाणीसह विविध विषयांवरील व्याख्यानाने त्यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
समाजाचे रोहा तालुका सरचिटणीस गणेश चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले तर सहचिटणीस राजन बिरवाडकर यांनी आभार मानले, यावेळी समाजातिल विद्यार्थ्यांचे गुणगौरव तसेच विशेष सन्मान, महिला मंडळाचे कार्यक्रम आदी संपन्न झाले, तर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी रुपेश नांदगावकर, सुरेश रोहेकर, रविंद्र पेणकर, सहचिटणीस राजन बिरवाडकर, संघटक दर्शन कदम, अमर नांदगावकर, सुनिल भोईर आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment