आरे बुद्रुक येथील दिड दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरण संपन्न

 हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला

खारी/रोहे-केशव म्हस्के

रोहा तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र आरे बुद्रुक येथे अखिलकोट ब्रम्हांडनायक श्री विठ्ठल रुक्मिणी व विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये फाल्गुन शु. सप्तमी रविवार दि.२६ फेब्रुवारी आणि सोमवार २७फेब्रुवारी २०२३ रोजी  फाल्गुन शु.अष्टमीच्या पवित्र शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चे सामुदायिक पारायण सोहळा आदी अध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांतर्गत दिड दिवसीय विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात व भावपुर्ण भक्तिमय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

  सालाबाद प्रमाणे २३ वर्षांची यशस्वी परंपरा अबाधित राखत स्वानंद सुख निवासी सद्गुरू गणपत बाबा गुडेकर अलिबागकर महाराज,स्वा.नि.सु.गुरुवर्य हभप.गोपाळ बाबा वाजे, स्वा.नि.सु.गुरुवर्य हभप.धोंडू बाबा कोलाटकर महाराजांच्या कृपाशिर्वादाने,गुरुवर्य हभप.गुरुवर्य नारायण दादा वाजे अलिबागकर (मठाधिपती पंढरपूर) यांच्या प्रमुख नेत्वृत्त्वाखाली हभप.गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील (बापू) यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या दिड दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,प्रवचन, हरिपाठ कीर्तन सेवा,हरीजागर,पहाटेचा काकडा,श्रींची पालखी मिरवणूक सोहोळा आदी अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाने श्री क्षेत्र आरे बुद्रुक नगरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी हरिनामाच्या ज्ञानोबा - तुकोबांच्या जयघोषाने  दुमदुमली असून संपूर्ण तालुक्यातील वारकऱ्यांची वैष्णवांची मांदीयाली येणाऱ्या प्रत्येक वारक-यांस श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारी निमित्ताने आल्याचे जाणविले.

यानिमित्ताने रविवार प्रथम दिवशी  हभप.नित्यानंद महाराज मांडवकर चणेरा यांचे प्रवचन सेवा,रोहा - चणेरा खारी पंचक्रोशी परिसरातील सामुदायिक हरिपाठ तर रात्रौ हभप. गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील (बापू) यांचे सुश्राव्य कीर्तन,तर सोमवार रोजी सकाळी १०:०० ते १२:०० दरम्यान गुरुवर्य हभप.गुरुवर्य नारायण दादा वाजे अलिबागकर (मठाधिपती पंढरपूर) यांनी काल्याची कीर्तन सेवेप्रसंगी उपस्थितांना रामायण, महाभारत,भगवद्गीता,ईश्वरप्राप्तीसाठी साधू - संत परंपरेच्या मौलिक विचारधारेच्या माध्यमातून बोधामृत देत मंत्रमुग्ध करणारी अमृतमीवाणीचा लाभ उपस्थित भाविकांनी भक्तीभावाने श्रवण सुखाचा घेतला.महाप्रसादि दुपार नंतर संपूर्ण गावातून" श्रींची" पालखी मिरवणूक सोहोळया माध्यमातून गावाला प्रति पंढरपूर चे स्वरूप प्राप्त झाले सर्वत्र जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल गजराने, ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले मोठ्या जल्लोष्यामध्ये आनंददायी उत्साही वातावरणामध्ये थाटामाटात पालखी मिरवणूक सोहोळा संपन्न झाला. 

        येथील दिड दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा यशस्वीतेसाठी गुरुबंधू हभप.भरत वाजे महाराज,अध्यक्ष माजी सरपंच सुधाकर शिंदे,उपाध्यक्ष विद्यमान ग्रा. पं. सदस्य आरे बु! प्रशांत शिंदे, ग्रा.पं.सदस्या सौ.ज्योत्स्ना मंगेश शिंदे, सुरेश शिंदे,देवजी मरवडे - तळवळी,लिलाधर थोरवे,प्रफुल दळवी, हरिपाठ मंडळाचे प्रमुख नेतृत्व हभप.नारायण भोईर,पांडुरंग भोईर,,नथुराम उतेकर,किरण भोईर,संदेश कडव,हरिश्चंद्र शिंगरे,वैभव खांडेकर,मनोहर पाडगे,हरेश भोईर,ओमकार उतेकर,सुप्रिया शिंदे,प्राजक्ता कडव,माऊली फॉर्म हाऊस चे मालक शैलेश दादा म्हात्रे,तुकाराम शिंदे आदी ग्रामस्थ मंडळ  व गावांतील सर्व क्रियाशील महिला मंडळ  बचत गट  व तरुण मंडळ अबालवृद्ध बाळगोपाळ,जेष्ठ नागरिक यांनी अथक मेहनत व अविरत परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog