रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू
वावे पोटगे येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश
कोलाड-शरद जाधव
रोहा तालुक्यातील वावे पोटगे येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे अलिबाग विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही लागतील असे चित्र असताना राष्ट्रवादी पक्षातील नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचं यावरून दिसून येत आहे.
वावे पोटगे घेतील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी आमदार अनिकेत तटकरे यांची भेट घेऊन विकासाच्या समस्या मांडताच तात्काळ मार्गी लावल्या व राष्ट्रवादी पक्षच विकास कामे करू शकतो हे ग्रामस्थांनी जाणले. आमदार अनिकेत तटकरे यांचे नेतृत्वच आपल्याला काहीतरी दिशा देऊ शकेल त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला गेला.
या गावातील उपसरपंच स्वप्निल ठाकूर, गजानन मेंदले, दिलीप गीजे, जितेंद्र गिजे, नामदेव गीजे, नथुराम गीजे, कैलास गिजे, उदय धारवे व ग्रामस्थ तसेच महिला मंडळाने जाहिर पक्षप्रवेश केला.
या वेळी खासदार सुनिल तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील,रामचंद्र सकपाळ, तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र वाजंत्री, पाडुरंग कडू,संतोष भोईर, मयूर खैरे, निवास खरिवले,रविना मालुसरे-भोसले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ता असो अगर नसो, राजकारणात काम करण्याची धमक ही तटकरे नेतृत्वाकडेच आहे. कोण सत्तेत असेल म्हणुन विकास होईल असे नाही. विकासाच्या बाबतीत शिंदे गटाने आमचा भ्रमनिरास केल्याचे उपसरपंच स्वप्निल ठाकूर यांनी सांगितले.
वावे पोटगे गावाला विकासाच्या बाबतीत आम्ही गेली अनेक वर्ष झुकते माप दिले. काही समज- गैरसमज यातून मंडळी दूर गेली होती. मात्र विकास कोण करु शकतो, हे येथील जनेतला माहीत असल्याने त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामूळे या गावाची सर्व विकास कामे पूर्ण करुन उद्धघाटनालाच या गावात येईल असे अभिवचन खासदार सुनिल तटकरे यांनी ग्रामस्थांना दिले.
Comments
Post a Comment