आमदार अदिती तटकरे यांनी घेतलेला हळदीकुंकू सोहळा ठरतोय आदर्श  

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

तळा- संजय रिकामे

तळा शहरात चंडिका देवी मैदानात श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आ.अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने घेतलेला हळदी कुंकूचा सोहळा शहरात आदर्श ठरत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे.

                 गेल्या अनेक वर्षांपासून आ.अदिती तटकरे या सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील महिला वर्गाला एकत्र करून विविध उपक्रम पार पडत असतात त्याचाच एक भाग म्हणून हा हळदीकुंकू सोहळा पार पाडण्यात आला या सोहळ्यास महिलांचाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. यावेळी आ.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते महिलांना वाण म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.महिलांमधील स्नेह आणि गोडवा कायमचा टिकावा या उद्देशाने तिळगुळ वाटप देखील करण्यात आले.      

 राष्ट्रवादी काँग्रेसने हळदी कुंकू उपक्रम राबवित एकप्रकारे आपलेपणा जपल्याने उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या हळदी कुंकू सोहळ्यात उखाणे स्पर्धा,प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या,येथे आलेल्या गायक आणि गायकांनी सदा बहार गाणी गाऊन महिलांची मने जिंकली तळा शहरातील महिलांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली यामध्ये सर्व वयोगटातील महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला महिलांनी विविध कलागुण सादर केले त्यात जेष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली.

खा.सुनील तटकरे यांच्या सौभाग्यवती वरदा तटकरे यांनी देखील उखाणा घेतला आणि उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी  यांनी पार पाडली.कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करून कार्यक्रमाला खुप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आ.अदिती तटकरे यांनी सर्व महिलांचे आभार मानले हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तटकरे परिवाराचे मोठं योगदान लाभले आहे.                              

                  या हळदी कुंकू सोहळ्यासाठी आ.अदिती तटकरे,सौ.वरदा तटकरे, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर,पंचायत समिती माजी सभापती अक्षरा कदम, राजिप माजी सभापती गीता जाधव,महिला जिल्हा युवती अध्यक्षा ॲड.सायली दळवी, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष जानव्ही शिंदे,शहर अध्यक्ष मेघना सुतार, माजी राजीप सदस्या माधुरी रोडे,नगरसेविका माधुरी  घोलप,यामिनी मेहतर, अर्चना तांबे,पुष्पा नागे,सारिका गवळी,गिरणे ग्रामपंचायत सरपंच ज्योती पायगुडे ,विविध ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog