"स्वर्गीय आमदार पा.रा. सानप यांनी समाजाची निस्वार्थीपणे सेवा केली"-कोलाड विभाग कुणबी युवक अध्यक्ष संदेश लोखंडे
कोलाड़-शरद जाधव
रोहा -माणगावचे आमदार ,कुणबी समाजाचे नेते, शेतकरी कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज स्वर्गीय पा.रा.सानप यांनी कुणबी समाजासाठी निस्वार्थपणे सेवा केली .यांचा आदर्श आजच्या युवकांनी जपावा, असे उद्रगार कोलाड विभाग अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय पा.रा सानप यांच्या संभे या मूळ गावी त्यांच्या परिवार तर्फे 23 व्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
पा.रा.सानप यांच्या स्मृतिदिनानिमित्त संभे प्राथंमिक शालेय मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय पा.रा सानप यांचे मोठे सुपुत्र देविदास सानप, माजी सरपंच संजय सानप, पोलीस पाटील अनंत सानप, ज्येष्ठ नागरिक होनाजी सानप, गणेश सानप, श्री. किजबिले मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते .
आमदार पा.रा सानप यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची सेवा केली. शेतकरी लढ्यात ते उतरले म्हणूनच त्यांचे नाव अजरामर आहे. आपण कुणबी समाज पा.रा.सानपां सारख्या एका आमदारांचे सामाजिक कार्य आजच्या कुणबी युवा पिढीसमोर मांडण्यात कमी पडतोय, अशी खंत संदेश लोखंडे आणि व्यक्त केली.
Comments
Post a Comment