आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी घेतली धाटाव येथील मोरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट


खारी/रोहा-केशव म्हस्के

 रोहे तालुक्यातील मौजे धाटाव गावचे स्थानिक रहिवासी तथा  रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सरचिटणीस शशिकांत मोरे यांच्या वडिलांचे तथा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.स्व.चंद्रकांत शिवराम मोरे  यांचे धाटाव येथील राहत्या घरी नुकतेच दुःखद निधन झाले.

  त्यांच्या सांत्वन भेटीकरिता कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य आ.अनिकेतभाई तटकरे यांनी मोरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. आपल्या दु:खामध्ये आम्ही सगळे सहभागी असून आपल्या सोबत आहोत अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो देवो हीच प्रार्थना.

    याप्रसंगी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे आदींसह धाटाव - किल्ला विभागातील पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog