रोह्यात लायन्स क्लब तर्फे ८० जणांची मधुमेह तपासणी
रोहा -प्रतिनिधी
१४ नोव्हेंबर २०२२ रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने रविवारी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या लायन डिस्ट्रिक्ट च्या वतीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत ६००० जणांची मधुमेह तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यातील सहभाग म्हणून लायन्स क्लब रोहाच्या वताने करीत मधुमेह तपासणी शिबीरात एकूण ८० जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली. रोह्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला रोहा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अंकिता खैरकर यांनीही सदिछा भेट दिली. या शिबिरा दरम्यान उपस्थित नागरिकांना डॉ. तुषार राजपूत यांनी मार्गदर्शन करताना मधुमेह हा बहुतांशी आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होत असून अनुवांशिक पद्धतीने मधुमेह होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचेही सांगितले. टाईप २ मधुमेह व अनुवांशिक मधुमेह योग्य जीवनशैली स्विकारली तर नियंत्रित होऊ शकतो, त्यासाठी नियमित आहार, व्यायाम व योग्य नियमित औषधोपाचाराची गरज डॉ. तुषार राजपूत यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. अपूर्वा क्षीरसागर व डॉ. रूपेश होडबे यांनीही संवाद साधला. सौ. मृणाल गुजर, सुरेखा गोरे व शिवानी पावसे यांनी तपासणी केली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस करता निरिक्षक म्हणून रोहा नगर परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक गजनफर हसन कलाब सर यांनी काम पाहिले.
यावेळी नुरूद्दीन रोहावाला, डॉ. कृष्णा जरग, पराग फुकणे, दिलिप तलवार, शिरिष सातपुते. लक्ष्मण शिट्याळकर, प्रभातसिंह गिरासे, भाऊसाहेब माने, सुश्मिता शिट्याळकर, प्रद्युत कुळकर्णी, वर्षा सातपुते, सुषमा तलवार, रशिदा रोहावाला, इलयाज डबीर, अलेफिया रोहावाला, प्राची कुळकर्णी, अनघा माने, स्वराली फुकणे, जुमाना रोहावाला, माया शहा, वर्षाराणी जरग, नचिकेत फुकणे हे लायन्स क्लब रोहाचे सदस्य सहभागी झाले होते.
हे शिबिर आयोजित करण्यासाठी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष संतोष खलपकर, सतोष यादव राजेश शेलार यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment