रोहा तालुक्यातून ओ.बी.सीं. च्या धडक मोर्चास बहुसंख्य ओ.बी.सी. बांधव उपस्थित राहणार

 धडक मोर्चाची सरकारला धडकी भरणार

    कोलाड नाका- (शरद जाधव)

        जातनिहाय जनगणनेसाठी गेली अनेक वर्ष सरकार उदासीन का?, या मागचे कटकारस्थान काय?. यामुळे ओबीसी समाज मागे राहिला असुन आता आमचा हक्क व सरकार दरबारी वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे.यासाठी ओबीसी समाज आता जागा झाला असुन, या मोर्चाच्या तयारीसाठी नेत्यांनी संपुर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला आहे.जिल्ह्यात ओबीसीं चे रान पेटल्याचे दिसून येत आहे. 

रोहा तालुक्यातून कुणबी, आगरी, तेली, माळी, नाभिक, परीट, भंडारी सह ओबीसीत मोडणारे असंख्य समाज बांधव या अलिबाग येथील धडक मोर्चात सहभागी होणार आहेत.

          1931 च्या जनगणनेनुसार ओबीसी समाज 52 टक्के आहे. मात्र शासन ते मान्य करीत नाही. अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याकाची जनगणना होते. त्यानुसार त्याना शासन दरबारी सवलती मिळतात. मात्र दर 10 वर्षानी जनगणना झालीच पाहिजे असा नियम असताना ती होत नाही. त्यामूळे ओबीसी ना शासन दरबारी काही मिळत नाही. मुलांना शिक्षणात सवलती मिळत नाही. वर्षानुवर्ष आपल्याला वंचित ठेवण्याचा डाव आखला गेला आहे.  

          त्यामूळे ओबीसी समाज संघटित झाला आहे . "चळवळीचा धागा हो" म्हणत जातनिहाय जनगणनेसाठी लढा उभारणे आवश्यक आहे. आता नाही तर कधीच नाही.म्हणत रायगड जिल्ह्यातून बहुसंख्यने असणारा ओबीसी समाज धडक मोर्चात सामिल होणार आहे. आपल्या पुढच्या पिढीकरिता जातनिहाय जनगणना आवश्यकच आहे, त्यासाठीच हा लढा असणार आहे. 

     ओबीसी नेते सुरेश मगर साहेब हे जनमोर्चा चे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामूळे रोहा तालुक्यावर खुप मोठी जबाबदारी असुन आपल्या न्याय हक्कासाठी व सुरेशजी मगर यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी 18 नोव्हेंबरच्या अलिबाग येथील धडक मोर्चास रोहा तालुक्यतून  बहुसंख्य ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबिसी समाजातील युवकांचे प्रेरणास्थान व रायगड जिल्हा पोलिस बॉईज संघटनेचे अध्यक्ष मुकेशजी भोकटे यांनी दिली.

      तर सदर सभेस ओबीसी चे महाराष्ट्र  राज्याचे नेते संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांतजी बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, उपाध्यक्ष दशरथ दादा पाटील, अरविंद डाफ़ले ,सुरेश मगर आदी नेते मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित  राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog