रायगड भूषण ह.भ.प.दगडु दळवी महाराज यांना शिवराज्य प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय आदर्श संत साहित्य वारकरी पुरस्कार

खारी/रोहा (केशव म्हस्के) 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील मौजे वांगणी गावचे सुपुत्र सेवानिवृत्त शिक्षक तथा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त समाज प्रबोधक ह.भ.प. दगडु कृष्णा दळवी गुरुजी यांना शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधत रोहा ,पेण ,सुधागड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या हस्ते शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.रोशन पाटील,प्रवक्ते विकी कदम आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हभप दगडु कृष्णा दळवी गुरुजी यांना राज्यस्तरीय आदर्श संत साहित्य वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

      सेवानिवृत्त शिक्षक तथा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त समाज प्रबोधक हभप दगडु कृष्णा दळवी गुरुजी यांनी कीर्तन प्रवचन सेवेच्या माध्यमातून अध्यात्मिक व धार्मिक प्रबोधना बरोबर हुंडाबळी प्रथा रोखणे,दारू बंदी, व्यसन मुक्ती आदी समाजामध्ये अनिष्ट रूढी,परंपरा समूळ नष्ट करण्यासाठी संतांनी वारकरी सांप्रदाय सुरू केला. संत साहित्याचा अभ्यास करीत संताच्या विचारांची बैठक समाजामध्ये रुजविण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि तो आज अव्याहातपणे सुरू ठेवलेल्या त्या संतांच्या विचारांचे पाईक म्हणून आपण मोठ्या प्रमाणात कार्य करत आहात. हे कार्य समाजासाठी पोषक आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जावळी वरसई येथील शिवराज्य प्रतिष्ठान च्या वतीने राज्य स्तरीय आदर्श संत साहित्य वारकरी पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.

   यावेळी रोहा पेण सुधागड विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या समवेत शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.रोशन पाटील,प्रवक्ते विकी कदम, रायगड भूषण हभप बाळाराम महाराज शेळके,हभप.मारुती महाराज कोल्हाटकर,आदी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog