रोह्यात "जय माँ दुर्गा व विश्वकर्मा चॕरिटेबल ट्रस्टकडून" कुंडलीका नदी तिरावर छठ पुजा उत्साहात संपन्न
रोहा-प्रतिनिधी
उत्तर भारतात दरवर्षी गुलाबी थंडीमध्ये उत्साहात संपन्न होणारी छठ पुजा रोह्यात संपन्न झाली. पुढील वर्षभर सुख , शांती, समाधान व संपन्नता देणारी ही छठ पुजा आहे अशी धारणा येथील उत्तर भारतातील उपासक व जनतेचीआहे. उत्तर भारतातील लोक कुठेही असले तरी ही छठ पुजा व सुर्य पुजा भक्ती भावाने व तन मन धनाने उत्साहात साजरी करतात.
छठ देवी पुजा व सुर्य देवाची पुजा रुपरेषा काही प्रमाणात अशी असते. पुजेच्या एक दिवस अगोदर सुर्य मावळते वेळी महिला वर्ग पाण्याची सुविधा उपलब्ध होईल असे ठिकाणी जाऊन पाण्यात उभे राहून सुर्याला व जल अर्पण करतात. पुजा-अर्चा करून रात्री भजन करत जागरण करून दुसऱ्या दिवशी पहाटे जलाशयाच्या ठिकाणी जाऊन पाण्यात उभे राहून उगवत्या सुर्याची जल अर्पण करून मनोभावे पुजा अर्चा करतात. त्या अनुषंगाने काल संध्याकाळी रोहा परिसरातील उत्तर भारतातील महिलावर्गाने कुंडलीका नदी तीरी संध्याकाळी व सकाळी उपस्थित राहून पुजा- अर्चा केली. या वेळी या ट्रस्टद्वारे नदी किनारी स्वागत बॅनर व लाईटींग आदीची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. सदर कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरपंच नरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर , पत्रकार महादेव सरसंबे , माजी उपसरपंच मनोहर सुर्वे , नगरसेवक महेश कोल्हाटकर . जितेंद्र दिवेकर, माजी.सरपंच रामा म्हात्रे, समाधान शिंदे ,अमित मोहिते , उत्तर भारतीय महासंघ जिल्हाध्यक्ष राम प्रकाश कुशवाहा आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश मिश्रा , उपाध्यक्ष रामनरेश साकेत , मदन शर्मा, हरीशंकर विश्वकर्मा, विक्रम विश्वकर्मा , गोपाल सिंह , विलास यादव , राम दिला विश्वकर्मा , मुरलीधर शर्मा, विजय कांत चौधरी, विशेष सल्लागार राम नरेश कुशवाहा , आर के विश्वकर्मा , आदी ने विशेष परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment