रोहा पोलीस,रोहा वाहतूक पोलीस रोहा प्रेस क्लब आणि रोहा सिटीजम फोरम च्या माध्यमातून 26/11 च्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित

रोहा-दीप वायडेकर

26/11 हा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ स्थानिक नागरिकांना आपला प्राण गमवायला लागला होता. 26 नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.

मुंबई पोलिस दलातील एएसआय तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून दिले होते.लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं होत. अश्या वीर जवानांना आदरांजली म्हणून आज रोहा पोलीस स्टेशन आणि रोहा वाहतूक पोलीस चौकी येथे दीपज्योत प्रज्वलीत करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रोहा पोलीस ठाण्यातील शहीद स्तंभाला अभिवादन करण्यात आले . 

 रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद  बाबर साहेब तसेच सर्व पोलीस कर्मचारी वृंद,रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब,सकल मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख,रोहा प्रेस क्लब चे अध्यक्ष शशिकांत मोरे,पराग फुकणे,नरेश कुशवाह ,निलेश शिर्के,शरद जाधव,सुहास येरूणकर,  प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच रोहा वाहतूक चौकी येथे रोहा वाहतूक पोलीस नरेश मोरे ,जेष्ठ नागरिक कांतीलाल जैन यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करून वीर शहीद जवानांना पुष्प अर्पित करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog