जनहित सामाजिक संस्था धाटाव व पुजा मेडिकलचा स्तुत्य उपक्रम  

तळाघर येथे नेत्र व मोतीबिंदू,रक्तदाब दाब व शुगर तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

रोहा/अष्टमी - नरेश कुशवाहा

 जनहित सामाजिक संस्था धाटाव रोहा तर्फे नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पुजा जेनरिक मेडिकल तर्फे मुफ्त रक्त दाब व शुगर तपासणी करण्यात आली . तळाघर हायस्कूलमध्ये रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन अलिबाग यांच्या विद्यमाने मेगा आय चेकअप कॅम्पचे आयोजन केले. यासाठी लायन्स क्लब रोहा, अंशुल स्पेशलिटी कंपनी यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

यावेळी लायन्स क्लबचे कमिटी मेंबर रवींद्र घरत, पराग फुकणे, धाटाव ग्रामपंचायत उपसरपंच अशोक मोरे, जनहित संस्थेचे अध्यक्ष अनंता म्हसकर, उपाध्यक्ष निलेश शेळके, सचिव दीपक पवार, खजिनदार महेश वाडकर, सह खजिनदार प्रज्योत गुरव, सदस्य रोहिदास भोकटे, विजय भुवड, रोशन घरट, कायदेशीर सल्लागार प्रियंका पिंपळकर, शाळेचे चेअरमन विठ्ठल मोरे, मुख्याध्यापक शिंदे सर, अंशुलचे व्यवस्थापक किशोर तावडे, डॉ. अनिवृद्ध तेली, अमोद केळकर, शुभम जाधव, राहुल घरत, ओबीसी समन्वय समिती जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, पूजा मेडिकलच्या पूजा गुरव यांच्यासहित शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनहित संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच पुजा जेनरिक मेडिकल तर्फे रक्त दाब व शुगर तपासणी मुफ्त केल्याने  ग्रामस्थांनी संस्थेचे अध्यक्ष अनंता म्हसकर व पदाधिकारी यांचे सहा पुजा मेडिकलच्या पुजा गुरव यांचे आभार मानले. तब्बल या शिबिरात 57 नागरिकांनी आपली नोंदणी करून तपासण्या केल्या त्या पॅकी 13 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पाठवण्यात येणार आहे.संस्थेच्या पुढील वाटचालीत रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, नवनवीन उद्योगांची माहिती देणारे शिक्षण, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे व विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेचा आहे असे जनहित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनंता म्हसकर व पदाधिकार्यांनी यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog