रोटरी आयडॉल स्पर्धेत रोह्याचे राकेश कागडा चमकले
उत्तेजनार्थ पारितोषिकासह रसिकांची मने जिंकली
रोहा -प्रतिनिधी
रोटरी आयडॉल स्पर्धेत रोह्याचे सुप्रसिद्ध गायक राकेश कागडा यांनी दिमाखदार कामगीरी केली असून या स्पर्धेत त्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिकासह रसिकांची मने जिंकली आहेत.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संपूर्ण राज्यभरातून आलेल्या नावाजलेल्या 160 गायकांमधून अंतिम फेरीसाठी 23 स्पर्धकांची निवड करण्यात आली, या 23 स्पर्धकांमधून रोह्याच्या राकेश कागडा यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
त्यांच्या गायनकौशल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी कौतुक केलेले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment