जेष्ठ पत्रकार श्री.मिलिंद अष्टिवकर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती
अ.भा.म.प.परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली घोषणा
रोहा-प्रतिनिधी
मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणुन परिचित असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री.मिलिंद सिताराम अष्टिवकर तर सरचिटणीसपदी अहमदनगर येथील श्री.मन्सूर शेख यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष श्री.शरद पाबळे यांनी पुणे येथील बैठकीत ही घोषणा केली.
रायगड जिल्हा प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष असलेले श्री.मिलिंद अष्टिवकर हे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्याही कार्यकारिणीवर आहेत. यापूर्वी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष, माजी कोकण विभागीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात कोकणातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. रोहा येथुन दैनिक लोकमत, दैनिक नवशक्ती अशा विविध जिल्हा दैनिकांमध्ये ते वार्ताहर, प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत विविध राज्यांचा अभ्यास दौऱ्यात हि त्यांनी सहभाग घेतलेला आहे. जिल्हा प्रेस क्लबचा त्यांचा अध्यक्षीय कार्यकाल मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण मागणीसाठीच्या विविध आंदोलनांमुळे संस्मरणीय ठरला आहे.
त्यांच्या या नियुक्तीचे सर्वस्तरातुन स्वागत होत असून परिषदेचे मुख्य विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार श्री.एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष भारत रांजणकर, परिषदेचे कोकण विभागीय सचिव जे.डी.पराडकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे आदींनी त्यांचेकडे संपर्क साधुन अभिनंदन केले आहे.
"आदिशक्ती न्युज"तर्फे मिलिंद अष्टिवकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment