सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार

रा.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन 

रोहा-प्रतिनिधी

रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार दि.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी अलिबाग येथील कार्यालयात रा. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती त्यांना दिली.यावेळी त्यांनी आदरपूर्वक सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न जाणून घेत आगामी काळात तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असे आश्वासन भेटी वेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.

 यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ग. खांडेकर,जिल्हा सरचिटणीस रमेश धों.लखिमले, सल्लागार वसंत ठ. शिंदे,जेष्ठ सदस्य बाळकृष्ण वी. पवार,नारायण शं.पाटील,रोहा तालुकाध्यक्ष गजानन र.गुरव,जिल्हा परिषद शिक्षण व क्रिडा समिती सदस्य अजय कापसे आदी उपस्थित होते. 

   रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना तालुकास्तरावर त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.यासाठी पंचायत समिती कार्यालयांकडुन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची गहाळ झालेली सेवा पुस्तके मिळत नसल्यामुळे दुय्यम सेवा पुस्तकांना मंजुरी द्यावी,१३/५/१४ रोजी सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर झाली मात्र आजही काही वंचीत शिक्षकांना त्याचा लाभ मिळत नाही, १९७२ नंतर सेवेत लागलेल्या अनट्रेंड शिक्षकांना कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पेन्शन मजूर व्हावी,यासोबतच दर महा अनियमित होणारी पेन्शन एक किंवा दोन तारखेलाच मिळावी असे आपले प्रमुख प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा शिक्षण अधिकारी सौ.गुरव यांची भेट घेत मांडले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्यथा जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog