राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन रोह्यात उत्साहात साजरा 

      रोहा-प्रतिनिधी

रोहा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस टी स्टॅण्ड परिसरातील पक्ष कार्यालया समोर तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, तटकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.  खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे व आम. अनिकेत तटकरे यांनी अनेक वर्षांपासून केलेल्या विकासात्मक व सामाजिक कामांमुळे शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज नंबर एकवर आहे. असे सांगत जि. प. प.सं. व नगर पालिके बरोबर असंख्य ग्राम पंचायतीत विजयाची घोडदौड अशाच पद्धतीने चालू राहील असा विश्वास तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर यांनी व्यक्त केला.                        

यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रीतम पाटील, तालुका युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे, शहर अध्यक्ष अमित उकडे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, जेष्ठनेते शंकर भगत, लीलाधर मोरे, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, अहमद दर्जी, राजेंद्र जैन, महेश कोल्हटकर,सुभाष राजे, मयूर पायगुडे,अजित मोरे, मजिद पठाण,विनीत वाकडे, निलेश शिर्के,समाधान शिंदे, विकास शिंदे, कैलास जैन, प्रथमेश खानोलकर, पप्पू सरणेकर,सनाउल्ला दर्जी आदी जण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog