मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर येथील सर्विस रोडची दुरुस्ती

पोलादपूर-ऋषाली राजू पवार 

        ‌ मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर येथील सर्व्हिस रोडची दुरुस्ती तसेच डांबरीकरण करण्यात आले.

          पोलादपूर येथे अंडरपास सुरू करण्यात आला आहे. परंतु बस स्थानक तसेच महाबळेश्वर फाटा व अनेक ठिकाणी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असून अनेक रिक्षा एस.टी. बस तसेच खासगी वाहने या सर्विस रोडचा वापर करतात.

             मान्सूनला सुरुवात झाल्याने सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली होती .महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. लहान-मोठे अपघातही काही प्रमाणात होत होते. त्यामुळे संबंधित कंपनी मार्फत सर्विस रोडची दुरुस्ती करून काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे.

               वाहन चालक व रोड लगत असलेली दुकाने- हॉटेल्स  यांना वारंवार पावसाचे पाणी साचल्यामुळे तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता सर्विस रोड चे काम करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात वाहनचालक व दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog