घोसाळे विभागातील वीज समस्येवरुन
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
कामात कुचराई करणाऱ्यांना दिली तंबी
रोहा-प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील घोसाळे विभागात विजेचा लपंडाव सतत सुरू असतो.त्यामुळे जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.जनतेच्या ह्या संतप्त भावना घोसाळे विभागातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिल्यावर आज सोमवार दिनांक १३ जुन २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वीज मंडळाचे अधिकारी व घोसाळे विभागातील कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त बैठकीचे आयोजन गीताबाग सुतारवाडी येथे करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्र्यांनी विज मंडळातील अधिकाऱ्यांना अक्षरशः फैलावर घेतले.पावसाळ्यात या विभागात विजेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी,आशा सुचना अधिकारी वर्गाला दिल्या.
आज आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्र्यां समवेत वीज मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच घोसाळे विभागातील संतोष पार्टे, स्वप्नील शिंदे, परेश धुमाळ, चंद्रकांत पार्टे, नामदेव घडशी, भाग्येश घोसाळकर ,रविना मालुसरे-भोसले यांचे समवेत तालुक्यातील प्रसाद देशमुख,राकेश शिंदे,मयुर खैरे,घनश्याम कराळे, अमोल टेमकर,गौरव सुर्वे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment