अपघातास निमंत्रण देणारे वाळलेले झाड रस्त्यावरून काढले बाहेर

भालगांव-घोसाळे विभागातील प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

दुरदृष्टी लाभलेल्या खासदार सुनिल तटकरेंना विभागातील जनतेकडून धन्यवाद 

रोहा-प्रतिनिधी

बऱ्याचदा एखादा अपघात घडला  की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला जाग येते ,याची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहे.मात्र हि घटना याहून वेगळी आहे.अपघात घडणार याची पुर्वकल्पना येत असताना त्यासाठी घेतलेल्या खबरदारीची आहे.दिसायला गोष्ट साधी असली तरी लाखमोलाचे जीव जपणारी आहे.

त्याचे असे झाले,रोहा हनुमान टेकडी मार्गाने  घोसाळे ,भालगांव, मुरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक  वाळलेले भलेमोठे झाड कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत उभे होते.पावसाळ्यात हे झाड पडून मोठी जीवित हानी होऊ शकते ही बाब रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंढे यांच्या निदर्शनास आली.त्यांनी याबाबतीतचे निवेदन रायगड चे खासदार मा.श्री सुनिल तटकरे साहेब,रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे,रायगड जिल्हा कार्यध्यक्ष मधूकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर ह्यांना दिले. ह्या प्रकरणाची लगेचच दखल घेऊन खासदार सुनिल तटकरे साहेबांनी बांधकाम विभाग रोहा ह्यांची मिटिंग घेऊन ते झाड तोडण्याच्या सूचना केल्या.त्यानंतर सर्व चक्रे जलदगतीने फिरून बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटना स्थळाची पाहणी करुन वस्तुस्थिती पाहिली.अपघातास निमंत्रण देणारे ते वाळके झाड तोडणे हा एकमेव मार्ग असल्याने लगेचच ते झाड तोडले गेले.

म्हणतात ना "prevention is better than cure " उपचारांपेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ" ह्या न्यायाने ते वाळके झाड तोडून पावसाळ्यात होणारी एक मोठी दुर्घटना रोखली गेली.आपल्या कार्यतत्परतेबद्दल सुप्रसिद्ध असलेल्या खासदार सुनिल तटकरे ,आदिती तटकरे,अनिकेत तटकरे यांना ह्या  मार्गाने प्रवास करणारे प्रवासी मनःपूर्वक धन्यवाद देत आहेत.

तसेच ह्या विषयाचा पाठपुरावा करणारे युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंढे,चंद्रकांत पार्टे,संतोष पार्टे, सुनिल शिंदे,हरेश नायणेकर,स्वप्निल शिंदे,रोहा तालुका युवती अध्यक्ष रविना मालुसरे-भोसले ह्यांचे तांबडी, घोसाळे, वाली, भालगांव विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments

Popular posts from this blog