भातसई पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू 

वावे पोटगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्निल ठाकुर यांचा आपल्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

रोहा-प्रतिनिधी

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भातसई पंचायत समिती गणावर संपुर्ण रोहा तालुक्यासह अलिबाग विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.तालुक्याचे राजकीय भुकंपाचे केंद्र ठरलेल्या ह्या विभागात,आज पुन्हा एकदा राजकीय हादरा जाणवला.रोहा तालुक्यात नव्याने दहा पंचायत समिती गण गठीत झाले आहेत.यापैकी नऊ पंचायत समिती गणांमध्ये शांतता आहे.तथापि मागील काही दिवसांपासून भातसई पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.अशातच आज झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाने मागील घटनेची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाल्याची चर्चा आज सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.

आज सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत वावे पोटगे ग्रामपंचायतीचे धडाडीचे डॅशिंग युवा उपसरपंच श्री. स्वप्नील ठाकुर तसेच वावे पोटगे आदिवासीवाडीचे युवक कार्यकर्ते मदन वाघमारे यांचे समवेत वावे खारचे बहुसंख्य युवक कार्यकर्ते यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

 खासदार सुनिल तटकरे साहेबांच्या आणि पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर तसेच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे यावेळी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ह्या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे भातसई पंचायत समिती गणात उत्साहाचे वातावरण असून पक्ष संघटन अधिक मजबूत झाले आहे.

Comments

Popular posts from this blog