खासदार सुनिल तटकरे व एक्सेल कंपनीच्या सहकार्याने, उडदवणे ग्रामस्थांच्या श्रमदानातुन पालदाड पुलाची डागडुजी
नागरिकांनी मानले उडदवणे ग्रामस्थांचे आभार
रोहा-प्रतिनिधी
रोहा शहर, MIDC व रोह्याचे उत्तर खोरे यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कुंडलिका नदीवरील पालदाड पुल. ब्रिटिश काळात टाटा कंपनीने सर्व प्रथम दगडी पुलाची निर्मिती केली.
पुढे काही वर्षानंतर सुनिल तटकरे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्याच पुलाचे नुतनीकरण करण्यात आले.मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असे.अनेकांना पाण्यातुन पुल पार करताना आपला जीव गमवावा लागला.स्थानिकांच्या आंदोलना नंतर अखेर ह्या पुला शेजारी नव्या व उंच पुलाची निर्मिती करण्यात आली.
कालांतराने जुन्या फरशी पुलावर व नव्या पुलावर मोठे-मोठे खड्डे पडल्यामुळे,पुलावरुन प्रवास करणे अत्यंत धोकादायक व कष्टप्रद झाले होते. उडदवणे ग्रामस्थ व पालदाड पुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी आपली व्यथा खासदार सुनिल तटकरे साहेबांकडे व्यक्त केली.
खासदार सुनिल तटकरे साहेबांकडे केलेल्या मागणीनुसार ,त्यांच्याकडून मिळालेल्या निधीतुन नविन पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक ८ जून २०२२ रोजी करण्यात आला.
उडदवणे गावचे युवा नेतृत्व रविद्र ठाकूर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आपल्या गावाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे.त्यांच्या व उडदवणे ग्रामस्थांच्या प्रयत्नातून एक्सेल कंपनीच्या मदतीतून रविवार दिनांक ५ जून २०२२ रोजी जुन्या पुलावरील खड्डे बुजविण्यात आले. एक्सल कंपनीच्या विवेकानंद रिसर्च सेंटरने या कामासाठी लागणारे मटेरियल उपलब्ध करुन दिले. ग्रामस्थ,युवक यांनी एकत्र येऊन त्या पुलावर काँक्रिटीकरण केले. रस्त्यावरील खड्डे भरल्यामुळे ये-जा करणारे नागरिक प्रचंड खुश झाले.श्रमदानातून केलेले काम व नागरिकांकडून होणारे कौतुक यामुळे उडदवणे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी युवा नेतृत्व रविद्र ठाकूर यांचे समवेत जेष्ठ कार्यकर्ते घनश्याम कराळे, संतोष गायकर, रोहिदास कोल्हटकर, गणपत गायकर, सचिन गायकर, सोनू गायकर, रवींद्र मोरे, सुनिल मोरे, देविदास ठाकूर, महादेव मोरे, रोशन ठाकूर, आदेश कासारे,सिद्धी म्हात्रे, सुधीर गायकर,जितेंद्र माळी, किशोर ठाकूर, चंद्रकांत गायकर, मोरेश्वर माळी, जनार्दन गायकर, अंबाजी माळी, मंगेश भोई,प्रसाद कोल्हटकर,अनिल खंडागळे, नितेश शिंदे, संतोष भोई, महेश तुपकर आदि ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
आपल्या अति जिव्हाळ्याच्या पुलावरील खड्डे भरले गेल्यामुळे,पुलावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खासदार सुनिल तटकरे,एक्सेल कंपनी व विशेषतः ह्या कामात पुढाकार घेणाऱ्या,प्रत्यक्ष श्रमदान करणाऱ्या उडदवणे ग्रामस्थांचे कौतुक करुन त्यांना धन्यवाद दिले आहेत .
Comments
Post a Comment