पालदाड पुल दुरुस्तीसह चकाचक डांबरी रस्त्याने सजला
खासदार सुनिल तटकरेंच्या कार्यकुशलतेला स्थानिकांचा सलाम
रोहा-प्रतिनिधी
"बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले" ह्या उक्तीची प्रचिती आज रोह्याच्या पालदाड पुल व उडदवणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी झटणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना आली.
निमित्त होते उडदवणे ग्रामस्थांना फक्त चारच दिवसांपुर्वी खासदार तटकरे साहेबांनी दिलेल्या एका शब्दाचे आणि त्या शब्दाच्या वचन पुर्ततेचे.
पालदाड पुलावरील खड्ड्यांनी नागरिक प्रचंड त्रस्त होते.ह्या विषयावर उडदवणे ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांना साकडे घातले होते.ह्या पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्या रस्त्याने प्रवास करताना खुपच त्रास सहन करावा लागत असे.हि बाब खासदार सुनिल तटकरे साहेबांनी समजुन घेतली.आणि अवघ्या चार दिवसात पुलावरील खड्डे बुजवून पुर्ण केले.अवघ्या चार दिवसांत हा डबल धमाका फक्त खासदार सुनिल तटकरे साहेबच करु शकतात याची अनुभूती उडदवणे विभागातील नागरिक अनुभवत आहेत.
ह्या कामामुळे उडदवणे पुलावरून ये- जा करणारे अनेक गावातील नागरिक, एमआयडीसी मधील कामगार अत्यंत खुश झाले आहेत. खासदार सुनिल तटकरे साहेब,पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्याने नागरिक आपल्या सजग लोकप्रतिनीधींना धन्यवाद देत आहेत.
पालदाड पुल दुरुस्ती,रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उडदवणे ग्रामस्थांचे योगदान खुप मोठे आहे.हे काम पूर्ण होण्यासाठी विनोद भाऊ पाशिलकर ,मधुकर पाटील, विजयराव मोरे ,जयवंत दादा मुंढे, घनश्याम कराळे,रविंद्र ठाकूर, संतोष गायकर,मालसई ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, आणि सदस्य यांनी ही मेहनत घेतली. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खासदार तटकरे साहेबांनी त्वरित निधी देऊन एका फोन वर कामाला सुरुवात झाली आणि चार दिवसात काम पूर्ण झाल्याबद्दल उडदवणे ग्रामस्थ, महिला मंडळ ,युवक-युवती, ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सदस्य व त्या विभागातील नागरिकांनी खासदार तटकरे साहेबांचे आभार मानले.
Comments
Post a Comment