यशवंतखारचे युवा नेतृत्व योगेश ठाकुर यांची जिल्हा परिषद गट युवक अध्यक्षपदी नियुक्ती
भातसई गणातील युवकांमध्ये उत्साहाला उधाण
रोहा-प्रतिनिधी
यशवंतखार तालुका रोहा येथील उत्तम संघटक,युवा नेतृत्व योगेश धर्मा ठाकुर यांचे पक्षातील योगदान व विभागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशींची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली.योगेश ठाकुर यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन खासदार सुनिल तटकरे,राज्यमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे व युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंढे यांनी योगेश ठाकुर यांची निडी तर्फे अष्टमी जिल्हा परिषद गटाच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगेश ठाकुर यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.मागील काही दिवसांपासुन भातसई पंचायत समिती गणामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे.योगेश ठाकुर यांचे ह्या विभागातील तरुणांबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ते ह्या पदाला न्याय देऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करतील ह्या हेतूने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू असा आशावाद योगेश ठाकुर यांनी व्यक्त केला.
खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते योगेश ठाकुर यांना नियुक्तीपत्र सुतारवाडी येथे प्रदान करण्यात आले.याप्रसंगी तालुका ओ.बी.सी.सेल अध्यक्ष संतोष भोईर,युवा नेतृत्व मयूर खैरे, रविंद्र ठाकूर,गणेश निकम ,सतिश मोहिते,अभि पोकळे, प्रितम मोहिते, अंकुश ताडकर, निवास खरविले ,पांडुरंग भोईर, नथुराम ठाकूर ,विठोबा गुंड ,नामदेव मढवी ,वासुदेव दिवकर, प्रकाश दिवकर ,किरण ठाकूर, दीपक दिवकर, निलेश सुरणकर तसेच पश्चिमखोरे विभातील सर्व युवक व जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment