कुर्ले विद्यालयाची १००% निकालाची हॕट्रिक

महाड-प्रतिनिधी
जनहित सेवा संस्था महाड संचलित कै. तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय कूर्ले तालुका महाड यांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सलग तीन वर्षे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकाल लावून शंभर टक्के निकालाची हॕट्रिक केली आहे.
   विद्यालयातून प्रथम क्रमांक -कुमारी लोखंडे रोशनी राम (84.80%) द्वितीय क्रमांक- कुमार तिटे सुमित बबन (81.60%) तृतीय क्रमांक- कुमार जंगम साहिल रमेश(80.60%) अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष शेखरजी ताडफळे,संस्था संचालक अक्षय ताडफळे ,शाळा समिती अध्यक्ष दत्ताराम मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सदस्य संदीप सपकाळ,शाळेचे मुख्याध्यापक अनंत शेलार, संस्था सहसचिव संतोष महाडिक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
       जनहित सेवा संस्था महाड संचलित कै. तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय कुर्ले तालुका महाड यांनी सलग तीन वर्ष शालांत शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकाल लावून हॅट्रिक केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog