रेल्वे प्रवासी संघर्ष समितीची सी.एस.टी.मुख्य कार्यालयात धडक

रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन सादर

रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार- रेल्वे अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन 

रोहा-प्रतिनिधी

रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वे डी.आर.एम.मुंबई यांना महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे सी.एस.टी.येथील मुख्य कार्यालयात देण्यात आले.

  कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांबाबतच्या समस्या, दिवा - रोहा पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात,रेल्वे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी मिळावी ,जेष्ठ नागरिक आणि दिवा-पनवेल फेऱ्या वाढवणे अशा अनेक विषयांवर मध्य रेल्वेच्या सिनियर डिसीम श्रीमती की.सुषमा यांनी निवेदन स्विकारले.

रोहा - दिवा पॅसेंजर गाडीच्या 🚆 फेऱ्या वाढविण्यासाठी आणि  रोह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध विषयावर, रेल्वेच्या संबंधित अधिकारी यांच्या दिनांक २९ जून २०२२ रोजी होणाऱ्या मिटींगमध्ये प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी श्री.अभिजित धुरत साहेब, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे महासंघ,अरूण पराडकर, काशिनाथ आंग्रे,प्रभू महाले,श्री.दिनेश मढवी ,अध्य‌क्ष श्री.नितिन वाघमारे, उपाध्यक्ष श्री.चंद्रोदय वाघमारे, सचिव सर्व निडी -रोहा पंच कमिटी मुंबई , पदाधिकारी,सौ.रविना मालुसरे-भोसले (पत्रकार) तसेच रोहा येथील जुन्या रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे आणि आताचे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रायगड जिल्हाअध्यक्ष श्री.सुर्यकांत वाघमारे, भालचंद्र पवार, प्रमोद गायकवाड, संकेत घोसाळकर आणि विशेष म्हणजे या मिटींगला चेंबूर येथील रेश्मा भोसले, तसेच मोठया संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते.

विभागीय व्यवस्थापक डी. आर. एम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्य रेल्वे मुंबई यांना मध्य रेल्वेवरील रोहा ते मुंबई पर्यंतच्या प्रवाशांच्या मांडण्यात आलेल्या समस्या पुढील प्रमाणे-

१)रोहा- दिवा -पॅसेंजर ट्रेन चे तिकीट दर सध्या 45 रुपये आहे, ते पूर्वीप्रमाणे 25 रुपये करण्यात यावे.

२)रत्नागिरी -दिवा ,सावंतवाडी- दिवा, नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्यांना रोहा रेल्वे स्टेशन येथे पूर्वीप्रमाणे थांबा व तिकीट उपलब्ध करण्यात यावे.

३)रोहा- दिवा व दिवा- रोहा पॅसेंजर या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात.

४)आर .पी .एफ. रेल्वे यांच्याकडून रोहा,निडी, नागोठणे, कासू पर्यंत रेल्वे आर.पी.एफ. कडून सुरक्षा मिळण्यात याव्यात.

५)रेल्वेचे खाजगीकरण तात्काळ थांबविण्यात यावे.

६)मागील काही वर्षांपासून रखडलेली लाखो रिक्त पदांची नोकर भरती तत्काळ करावी. रद्द केलेली पदे बहाल करावेत.

७)रोहा रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी वाढविण्यात यावी.

८)ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी व अपंगांसाठी रोहा- दिवा पॅसेंजर मध्ये शौचालय उपलब्ध करून मिळावे.

९)निडी रेल्वेस्थानकावर दिवा- रत्नागिरी व सावंतवाडी- दिवा गाडीचा थांबा पूर्ववत करून या गाड्यांच्या तिकिटाची उपलब्धता व्हावी.

१०)दिवा -रोहा येणारी गाडी ही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लावण्यात यावी.

११)कोरोना काळामध्ये कल्याण- रोहा ,रोहा- कल्याण पॅसेंजर चालू होती. ती पूर्ववत पूर्वीच्याच वेळेप्रमाणे चालु करण्यात यावी. 

रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वतीने दिलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघर्ष समिती च्या वतीने करण्यात आली.त्यास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

Comments

Popular posts from this blog