नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्याचे रोह्यात पडसाद
पैंगबरांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल रोहा-अष्टमी मुस्लिम समाजाच्यावतीने नूपुर शर्मांचा निषेध
रोहा-प्रतिनिधी
नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशासह, परदेशातही तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
ईस्लाम धर्माचे प्रेषित ( पैंगबर ) हजरत मोहम्मद ( स.अ. स.) यांच्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. पैंगबरांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा निषेध करत रोहा - अष्टमी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने शुक्रवारी दुपारी २ वा. तहसीलदार व पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत श्रीमती नूपुर शर्मा यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, आपल्या भावना व निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवून या विषयाची दखल घेतली जाईल असे सांगत समाज बांधवांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अमोलकुमार झेंडे यांनी केले. रोहा- अष्टमी येथील पाच मशीद कमिटीच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी रोहा- अष्टमी अल- खेरीया कमिटीचे अध्यक्ष तथा अष्टमी मुस्लिम समाज अध्यक्ष शफी पनसारी, रोहा खालचा मोहल्ला अध्यक्ष हाफिज एजाज किरकिरे, रोहा वरचा मोहल्ला अध्यक्ष मुजीब आलेकर, अहले- हदीस कमिटी अध्यक्ष मौलाना मसरूर आलम खान, मिल्लत नगर अध्यक्ष अ. रज्जाक तुळवे अष्टमी उपाध्यक्ष मन्सूर नाडकर, दिलदार नाडकर यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देत श्रीमती नूपुर शर्मा यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. पोलीस उप विभागीय अधिकारी अमोलकुमार झेंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर व नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी सदरचे निवेदन स्वीकारले. यावेळी मौलाना सादिक, अहमद दर्जी, निसार मोर्बेकर, अ. कादिर रोगे, मुन्नवर पठाण, मजिद पठाण, उस्मान रोहेकर, नदीम सिद्दीक, जलील तुपके,सुल्तान पानसरे,अनिस मोर्बेकर, शफी चोगले, एजाज वासकर, मजिद वलीले, अफसर करजीकर, समीर दर्जी, वसीम सावरटकर,मुबिन करजीकर, बशीर डबीर आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संतप्त मुस्लिम समाज बांधवांनी घोषणा न देता आपला निषेध व्यक्त केला.
Comments
Post a Comment