पत्रकार संजय रिकामे समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल

भानंगकोंड ग्रामस्थांसह अनेक कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ

तळा :किशोर पितळे

कोकणचे भाग्य विधाते रायगड रत्नागिरीचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास दाखवून एक गांव एक पक्ष या संकल्पनेतून दि.५जून रोजी भानंगकोंड येथील शिवगर्जना मित्रमंडळ व ग्रामस्थांनी सुतारवाडी येथे तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी तळा तालुका अध्यक्ष नाना भौड मागासवर्गीय सेल जिल्हा अध्यक्ष अँड उत्तम जाधव तळा नगरपंचायत उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे ,रायगड युवती अध्यक्षा अँड.सायली दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून भानंगकोंड ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचा संबंध आहेत मधल्या काळात काही जणांनी वेगळी वाट धरली होती मात्र त्यांना कटू अनुभव आला म्हणून या संदर्भात पत्रकार संजय रिकामे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण गावाची एकीकरण संघटन करण्या संदर्भात घेतलेल्या भुमिके बद्दल मी त्याचे व सहकारी यांचे मनापासून स्वागत करतो.यापुढे विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही विकास ग़ंगा वाहीली जाईल व प्रवेशकर्त्याचा मान सन्मान राखला जाईल असे अभिवचन दिले.

शिवगर्जना मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष दिनेश ठसाळ,माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नटे,सिताराम काते,वसंत काते,संतोष काते, दत्ता काते,रतीश काते,हरिश्चंद्र तांबडे,रोहिदास तांबडे, जयदास तांबडे,प्रशांत तांबडे,वैभव तांबडे,सागरतांबडे, समीर तांबडे,संतोष तांबडे,सचिन रिकामे,केतन रिकामे, दिनेश नटे,मदन ठसाळ,रमेश ठसाळ, कृपेश घाटवळ,संतोष डोंगरे,रमेश मीरगळ,यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले.या पक्ष प्रवेशामुळे भानंग ग्रामपंचायतीत शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून मागील ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणुकीत पत्रकार संजय रिकामे यांनी शिवसेनेचा सरपंच निवडून आणीत तळा तालुक्यात एकमेव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला होता .आता पत्रकार रिकामे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाले असल्याने या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार हेपक्के झाले असून शिवसेनेकडे असलेले एकमेव ग्रामपंचायत देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाणार असून तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस ची आता सत्ता येणार असल्याचे बोलले जात आहे.या बंम्पर पक्ष प्रवेशामुळे शिवसेना मोठा धक्का बसला आहे .आगामी पंचायत समिती, काकडशेत गण व जि प.महागांव गट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश हा विजयाची नांदी ठरणार आहे.असे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

Comments

Popular posts from this blog