रोहा पोलिसांची दमदार कामगिरी मोटारसायकल चोराला मुद्देमालासह केली अटक

रोहा-प्रतिनिधी

रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर यांनी रोहा पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच आपल्या कार्यकुशलतेची चुणुक  दाखवली आहे.या अगोदर एम. एस.ई. बी. ची डीपी चोरी करणाऱ्यांना त्यांनी गजाआड पाठवलेची घटना ताजी असतानाच त्यांचे कर्तबगार कर्मचारी पोउनि.धनाजी साठे, अक्षय जाधव,सुनिल खराटे यांनी आणखी एका चोरीचा छडा लावला आहे.

रोहा व खोपोली शहरातून मोटरसायकलींची चोरी करणार्‍या विलास नारायण ढुमणे वय वर्षे एकवीस राहणार फणस वाडी तालुका रोहा याला घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पॅशन प्रो व युनिकॉन या दोन चोरीला गेलेल्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या.

रोहा पोलीस ठाणे मध्ये गुन्हे रजिस्टर नंबर 99/ 2022 भारवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये 149 /2022 नुसार कलम 379 नुसार गुन्हा दाखल आहे.

 आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.रोहा  पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे,पो.ना. अक्षय जाधव,पो.ना.सुनील खराटे यांनी केलेल्या धरपकडी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 रोहा पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र होत असून गुन्हेगारांनी मात्र धसका घेतल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog