हरिनामाच्या घोषात खासदार सुनिल तटकरे यांनी धरला ठेका

वरसे येथे अखंड हरिनांम सप्ताहाची सांगता 

रोहा -शरद जाधव

रोहा तालुक्यातील धाटाव किल्ला पंचक्रोशीचा 36 वा अखंड हरिनांम सप्ताह मोठ्या उत्साहात माऊलींच्या जयघोषात संपन्न झाला.

काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी खासदार सुनिल तटकरे यानी आवर्जून उपस्थिती लावली.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्र वादी तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर,विजयराव मोरे,सुरेश मगर,रामचंद्र सकपाळ,शिवराम शिंदे, रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटील, हेमंत कांबळे, अनिल भगत, अप्पा देशमुख,अमित मोहिते,हभप हरिश्चंद्र पाटील महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.

मागिल 36 वर्षांपासुन सातत्याने अखंड हरिनांम सप्ताह तितक्याच उत्साहात सुरू आहे. या वर्षी सप्ताहाचे यजमानपद वरसे ग्रामस्थांकडे असल्याने मधुकर पाटील,रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटील, हेमंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ,तरुणवर्ग सप्ताह सोहळा पार पाडण्यासाठी एकवटले होते.



यावेळी बीड,लातूर,पंढ़रपूर येथील नामवंत कीर्तनकार,महंत यांची किर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती.सप्ताह काळात जणू विठूरायाची नगरी वरसे येथे अवतरल्याचे दिसून येत होते.

     माऊलींनी दिलेले विचार आजही तितक्याच ताकदीने जपुन हरीनामाचा प्रसार केला जात आहे.महामारीच्या संकटात  हरिनामाचा जप ही खुप मोठी ताकद आहे. सर्वांना 2022 हे वर्ष भयमुक्त व कोरोना मुक्त जावो, तोंडाला बांधलेली पट्टी निघुन एकमेकांचे चेहरे आनंदाने फुलोत,असे विचार खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थित  जनसमुदाय समोर व्यक्त केले.

 ||जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती|| या संत वचना प्रमाणे आजच्या कलीयुगात संतांच्या विचारांची गरज असुन तेच विचार आपल्याला संसारात तारु शकतील,असे मत सप्ताह प्रसंगी मधुकर पाटील यांनी पत्रकारांबरोबर चर्चा करताना व्यक्त केले.

      वरसे ग्रामस्थांनी केलेल्या उत्तम  नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.

       सदर सप्ताह सोहळ्यात तुळशीची माळ गळ्यात असणाऱ्या तरुण वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. माऊलीच्या नामाचा व वारकरी सांप्रदायाचा प्रसार व करण्याचे काम तरुण वर्ग करित असुन हि दिलासादायक बाब ह्या सप्ताहात दिसून आली.

कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करुन हा सोहळा संपन्न झाला.

हरिनामाच्या घोषात खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकर्ते व वारकऱ्यांसह ठेका धरला

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा   👇👇👇



Comments

Popular posts from this blog