ब्राह्मण मंडळ रोहा आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

रोहा-निखिल दाते

ब्राह्मण मंडळ रोहा व अभंग सेवा मंडळ रोहा तर्फे रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रोहेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला, या शिबिरात 64 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

सदर रक्तदान शिबिराचे उद्धघाटन व दीपप्रज्वलन ब्राह्मण समाजातील दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री. सुभाषदादा मेहेंदळे, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. श्रीकांत ओक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. सुभाषदादा मेहेंदळे यांनी ब्राह्मण मंडळ रोहाच्या कार्याला शुभेच्छा देऊन मंडळाच्या कार्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचा मानस व्यक्त केला.

सदर रक्तदान शिबिराला रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी त्यांनी शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.

त्यांच्यासमवेत नगरसेवक महेंद्र गुजर, महेंद्र दिवेकर, महेश कोल्हटकर, शहर अध्यक्ष अमित उकडे, चंद्रकात पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर,समीर शेडगे, भाटे वाचनालय अध्यक्ष किशोर तावडे, ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष राकेश जैन, मनोज जैन, सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट अध्यक्ष राजेश काफरे, रोटरी क्लबचे राकेश कागडा आदींनीही रक्तदान शिबिराला भेट दिली.

शिबिराचा समारोप रोहे तहसीलदार कार्यालयाच्या नायब तहसिलदार सौ. मानसी साठे व सेवाभाव जपणारे सुप्रसिद्ध डॉक्टर शंतनु आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

समारोपप्रसंगी शासकीय रक्तपेढी अलिबागचे डॉ. दिपक गोसावी व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण मंडळ रोहा अध्यक्ष अमित आठवले यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष आनंद काळे, सचिव निखिल दाते, खजिनदार चैतन्य आठवले,प्रकाश कुंटे,सौ.नेहा आवळसकर, सुमित रिसबुड,श्रीनिवास रिसबुड, उदय गोखले,नितीन जोशी,मोहन साठे, सचिन आठवले,सुरेंद्र आगरकर, विवेक बापट, महेश पेंडसे,चिन्मय बापट, श्रीपाद जोशी, सौ. मानसी दाते, सौ. संगीता फाटक, सौ. आरती धारप,सौ. प्राजक्ता पाटणकर आदींसह समाजबांधवांनी विशेष मेहेनत घेतली.

Comments

Popular posts from this blog