माणुसकी प्रतिष्ठान ग्रंथालय व कार्यालय वर्धापन दिन साजरा

अलिबाग-प्रतिनिधी

 दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र व रायगड पोलिस कल्याण शाखा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा पंधरवडा निमित्त विविध मराठी  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये काव्य संमेलन, परिसंवाद, अभिवाचन, प्रश्नमंजुषा, अंताक्षरी असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.बहुतांश पोलीस,विद्यार्थी व लोकांनी सहभाग घेतला होता. 

 माणुसकी ग्रंथालय व कार्यालयाच्या एक वर्ष पुर्ती निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रायगड पोलीस निरीक्षक,श्री. भास्कर पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, श्री रमेश धनावडे, ज्येष्ठसाहित्यिक, कवी व रिलायन्स जनसंपर्क अधिकारी रायगड,रायगड जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड, संवादतज्ञ सुरेश पाटील,डॉ. चंद्रशेखर साठे, डॉ. कीर्ती साठे,  रायगड भूषण निळकर महाराज, भावेश्री उमेश वाळंज, देवेंद्र केळुसकर, रेश्मा वारगे, जीवीता पाटील अध्यक्षा तेजस्विनी फाउंडेशन, निलेश थळे संगीतकार अध्यक्ष नव कलाकृती फाउंडेशन, संजय पाडेकर सह्याद्री प्रतिष्ठान,  बालगिर्यारोहक शर्वीका जितेन म्हात्रे, मोहन पाटील अध्यक्ष लायन्स क्लब मांडवा , तानाजी भोसले खजिनदार लायन्स श्रीबाग तसेच इतर संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.दिंडीची सुरुवात माणुसकी प्रतिष्ठान कार्यालय येथून ग्रंथांची पूजा व दीप प्रज्वलन करून सुरू झाली. तिथून ग्रंथ दिंडी पायी चालत दत्त टेकडी येथील दत्त मंदिरात पोहोचले , त्यानंतर देवेंद्र केळूसकर यांनी मराठी संस्कृती बद्दल विशेष माहिती दिली, डॉ. साठे यांनी साहित्यिक बद्दल आपले अनुभव सांगितले, रमेश धनावडे यांनी "तू किती छान"ही कविता सादर केली व सर्व संस्थेच्या सदस्यांचे कौतुक करत  माणुसकी प्रतिष्ठान च्या  कार्याबद्दल स्तुती केली व भविष्यातील कार्यास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात  भास्कर पवार पोलिस निरीक्षक यांनी रायगड पोलिसांचा एक वेगळा पैलू सर्वांसमोर आणला , बारा ते चोवीस तास काम करणाऱ्या पोलिसांना थोडासा विसावा मिळावा किंवा कुठेतरी कलेमध्ये मन रमावे याकरिता या पंधरवडावाचे आयोजन केले,  जयवंत गायकवाड रायगड जिल्हा परिषद समन्वयक यांनी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर यांचे कार्य व सर्व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सामाजिक काम करण्याचा सल्ला दिला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणुसकी प्रतिष्ठान शिक्षण विभाग प्रमुख संदीप वारगे यांनी उत्तमरित्या पार पाडले. 

डॉ.राजाराम हुलवान माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र यांनी वर्षभर केलेल्या कामाचा आढावा तसेच ग्रंथालयाचे महत्व अजूनही किती आहे किंवा नवीन मुलांपर्यंत हे ग्रंथालय टिकून राहिले पाहिजे आपली संस्कृती लोप न पावता ती कशी वाढली पाहिजे किंवा ती वाढवली पाहिजे याकरिता मार्गदर्शन केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमातील सहभागी मान्यवर प्रमुख पाहुणे दिक्षा चेरकर, आरती राऊत, दीपक पाटील, प्राची ठाकूर यांचा सन्मानपत्र देउन कौतुक करण्यात आले. भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयक संदिप वारगे यांचा सत्कार करण्यात आला. थळ हायस्कूलचे विदयार्थी घोष वाक्ये फलक घेऊन या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

माणुसकी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष तानाजी आगलावे,उपाध्यक्ष सतीश कणसे, नामदेव कटरे, प्रकाश बुरुंगले, अनिल अर्जुन, शामराव रेवे, पांडुरंग पावरा, जगदीश पाटील,  कृष्णा वाघमारे, दिवाकर निषाद,आप्पा मोटे, संजय काळेल,ज्ञानेश्वर जावके,दिपक इतर सदस्य उपस्थित होते.

प्रत्येक माणसाने स्वतःच्या उन्नती सोबत समाजाची उन्नती साधण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास पुस्तकांचे वाचन केले पाहिजे 

रमेश धनावडे-जेष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, जनसंपर्क अधिकारी-

      "माणुसकी प्रतिष्ठान चे कार्य हे समाजाला वाहिलेले कार्य आहे माणूसाला आडवा, माणसाची जिरवा यापेक्षा एकमेकांना सहकार्य करून समाजाची प्रगती झाली तर देशाला प्रगतीपथावर येईल".

जयवंत गायकवाड.-जिल्हा प्रकल्पप्रमुख रायगड जिल्हा परिषद अलिबाग

"आजच्या काळात पैसा कितीही जमविला तरी शेवटी माणसांमधील माणुसकीच आपल्याला उपयोगी पडते हे कोर्टाने सर्वांना दाखवून दिले आहे"

 भास्कर पवार.पोलीस निरीक्षक ,कल्याण शाखा रायगड पोलीस-

रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक समाज योग्य समाजोपयोगी स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यामध्ये निर्मल गणेशोत्सव या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यात माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर ने तृतीय क्रमांक पटकाविला त्या बद्दल ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान व टीम सदस्यांना गौरविण्यात आले.

विडिओ पाहण्यासाठी  क्लिक कराComments

Popular posts from this blog