ऐनघर ता.रोहा येथे जिजाऊ जयंती साजरी
रोहा-प्रतिनिधी
शिवरायांना घडविणाऱ्या,स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या व ते सत्यात उतरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती. दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी ऐनघर ता.रोहा येथे सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कोरोना नियमांचे पालन करून व सुरक्षित अंतर राखण्यात आले, कमीत-कमी लोकांमध्ये एक तासाच्या कालावधीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या सरपंच ,सर्व सदस्य व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते,तसेच शिवनेरी ग्राम संघाचे पदाधिकारी,महिला समूहाचे अध्यक्ष,सचिव ,वांगणी ग्राम पंचायत सी.आर.पी.दिपाली गोळे, बँक सखी वर्षा जांबेकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment