मुबंई गोवा महामार्गावरील खांब गावानजिक जीवघेणे खड्डे

खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराला जाग येते का ? संतप्त प्रवासी वर्गाचा सवाल                 

कोलाड -श्याम लोखंडे 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब गावाच्या बायपास रस्त्याच्या बाजूकडून सनी ढाब्या समोरील कोलाडकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठया प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे दुचाकी स्वार व प्रवासी वर्गाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी संबधित ठेकेदाराला जाग येते काय? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.

                  मुंबई-गोवा हायवे वरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेली बारा वर्षापासून सुरु आहे. काम अद्यापही पुर्ण झाले नाही ही मोठी गंभीर समस्या आहे. हे काम केव्हा पुर्ण होईल? याची खात्री ही देता येत नाही.दोन महिनापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढीव रक्कम ही मंजूर केली. तरीही या रस्त्याच्या कामाला गती आलेली दिसत नाही.रस्त्याचे काम सुरु करणे राहिले दूरच , पावसाळ्यात पडलेले खड्डेही भरले गेले नाहीत. 


     
एका महिन्यापूर्वी पुई नजीक असलेल्या  महिसदरा नदीपुलावर मोठे खड्डे पडून टुव्हीलर स्वार जखमी झाला होता.याची बातमी प्रसारमाध्यमांवर आल्यावर हे खड्डे भरले गेले.याचप्रमाणे चार दिवसापूर्वी पुगांव गावाजवळ दत्ताराम अधिकारी यांच्या ऊसाच्या रसाच्या टपरी जवळ  रस्त्याला पडलेल्या मोठया खड्डयामुळे टु व्हीलर वरून पडून एक महिला जखमी झाली.याबाबतीत वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर त्वरित हा खड्डा भरला गेला.परंतु खांब गावानजीक पडलेले खड्डे अद्याप भरले गेले नाहीत ,यामुळे काल या खड्डयातून प्रवास करतांना ऍक्टिवा स्लिप होऊन ऍक्टिवा चालक जखमी झाला.या रस्त्यावर प्रवाशी जखमी झाल्यावरच खड्डे भरले जातात का? ठेकेदार प्रवाशी जखमी होण्याची वाट बघत आहेत का? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून सर्वत्र केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog