आई एकविरा हॉटेलचे शानदार उध्दघाटन

खवय्ये रोहेकरांच्या सेवेसाठी रुचकर जेवणाची पर्वणी

         रोहा नगर परिषद हद्दितील अष्टमी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूशेट म्हात्रे व शशिकांत कडू यांच्या मालकिच्या आई एकविरा हाॕटेलचे शानदार उध्दघाटन राष्ट्रवादी काँग्रेस  जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर शेट पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.    यावेळी सभापती जनाबाई वाघमारे,विजयराव मोरे, विनोद भाऊ पाशीलकर, अनिल भगत,उपसभापती रामचंद्र  सकपाळ,लक्ष्मण महाले, गणेश मढवी ,अनंत देशमुख ,सुनिल देशमुख, पांडूरंग कडू, वसंत भोईर ,किरण मोरे आदी कार्यकर्ते  व मित्र परिवार उपस्थित होते. 

            रोहा शहराला लागुन असलेल्या कुंडलिका नदी पूलाला लागुन अष्टमी रस्त्यावर एकविरा हाॕटेल हे प्रवासी व पर्यटकांसाठी सज्ज झाले आहे. येथे कोकणी पध्दतीचे घरगुती रुचकर शाकाहारी- मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे.कोळी-आगरी पध्दतीचे मांसाहारी जेवण हे या हाॕटेलचे वैशिष्ट्ये आहे.      सर्वसामान्यांपासून मध्यम वर्गियांपर्यंत त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात ग्राहकांना जेवणाचा आस्वाद घेता येणार असल्याचे हाॕटेलचे मालक नंदू शेट म्हात्रे यांनी सांगितले. 

         तर रोहे शहराला लागुन प्रशस्त अशा मोकळ्या जागेत हे हॉटेल आहे, त्यामुळे कोकणात येणारे पर्यटक येथील लज्जतदार जेवणाचा निश्चितच आनंद घेतील व लवकरच एकविरा हाॕटेल ग्राहकांच्या पसंतीला उतरेल असे वक्तव्य उद्धघाटन समयी मधुकर पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog