राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयोत्सव

नवनिर्वाचित नगरसेवक खासदार सुनिल तटकरे यांच्या भेटीला


तळा -किशोर पितळे 

 तळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तुंग यश संपादन केले, विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांनी सर्वप्रथम रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचे सुतारवाडी कार्यालय गाठले.तळा नगरपंचायतीत गेली वीस वर्षे शिवसेना पक्षाची सत्ता उलथवून शिवसेना उमेदवारांचा दारुण पराभव करीत विजय मिळवल्या नंतर रायगडचे खासदार सुनिल तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांची त्यांनी सर्वप्रथम भेट घेतली व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा झालेला विजय हा तळा शहरातील सर्वसामान्य जनतेचा विजय असून तटकरे परिवाराने घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगून त्यांचे आभार मानले.                

    खासदार सुनिल तटकरे यांनी तळा तालुक्यातील विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्त्यांना कायमच ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तटकरे यांच्यावर असलेली निष्ठा हिच उमेदवारांच्या विजयासाठी सत्कारणी लागली आहे.नगरपंचायत निवडणुकीत ही त्याचा प्रत्यय आला.तळा शहरात गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश येत होते परंतु यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांचा पररेक्ट कार्यक्रम केला असून शहरातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल असा विश्वास सर्व नगरसेवक-पदाधिकारी यांनी व्यक्त करून खासदार सुनिल तटकरे यांचे आभार मानले. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक,नगरसेविका पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे भविष्यात तळा शहरातील राजकारणात आगामी काळात उलथापालथ पहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog