संकल्प सेवा ग्रुप व एंजॉय मित्र ग्रुप मंडळ महाड आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड-इस्माईल मापकर
दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संकल्प सेवा ग्रुप महाड व एन्जॉय मित्र मंडळ महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने जनकल्याण रक्तपेढी महाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून व स्वर्गीय मोहन जंगम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच प्रसिद्ध माध्यमिक शिक्षक तथा पत्रकार स्वर्गीय शिंगटे सर यांना श्रद्धांजली अर्पण करून संजय भाई मेहता,मोहन काका शेट ,गणेश जंगम, विजय लाड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घघाटन संपन्न झाले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने संकल्प सेवा ग्रुप आणि एन्जॉय मित्र मंडळ यांच्या आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले .या दोन्ही संघटनांना महाड शहरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या रक्तदानाच्या कार्याबद्दल नागरिकांची कौतुकाची थाप पडत आहे .याच कार्यक्रमात डॉक्टर कु.अदिती अविनाश खरे यांचे सन्मानचिन्ह देवून संकल्प सेवा ग्रुप महाडच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोषजी घरटकर तसेच चिंतामणी ट्रेडर्स चे मालक राजीव वनारसे तसेच रत्नदिप ज्वेलर्सचे मालक उपस्थित होते.रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी एन्जॉय मित्र मंडळाचे श्री. कैलास जंगम तसेच संकल्प सेवा ग्रुप महाडचे प्रल्हाद ठाकूर , अविनाश खरे , संजय आव्हाड, संजय शेठ, शैलेश काकडे , राजूदास पवार , कुंदन विन्हेरकर ,दयानंद जैतू तसेच संकल्प सेवा ग्रुपचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली त्यातुनच हे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.
Comments
Post a Comment