कु.सानिका बेंडेकरने सुमधुर गीत गाऊन श्रोत्यांची जिंकली मने
सहा.पोलीस उपनिरीक्षक राम पवार यांनी केला गुणगौरव
स्वानंद सुखनिवासी सदगुरु शिगवण महाराज स्थापित हरी ओम सतनाम वारकरी संप्रदाय समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताह महा नाम जप यज्ञ केले व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन नुकतेच श्रीक्षेत्र शिरगाव तालुका चिपळूण येथे करण्यात आले होते.
सदर सप्ताह दि. २९ डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहामध्ये राधाकृष्णाचे उत्कृष्ट गीत गाऊन मने जिंकणाऱ्या सानिका दिपक बेंडकर राहणार कुंभार्ली सांगळेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या विद्यार्थिनीचा सुधागड-पाली पोलिस स्टेशनचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.राम मारुती पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
सानिकाने भावी जीवनात खूप प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे,गुरुजनांचे ,गावाचे नाव लौकिक करावे म्हणून शुभेच्छा देऊन कौतुक केले.
स्वानंद सुखनिवासी सदगुरु शिगवण महाराज संस्थापित हरिओम सनातन वारकरी संप्रदाय समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व महानामजप यज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास खूप वर्षांची परंपरा असून दरवर्षी श्रीक्षेत्र शिरगाव तालुका चिपळूण येथे सप्ताहमध्ये हजारो भाविक येत असतात.
Comments
Post a Comment