खैराळे येथील गंभे परिवाराचे कुलदैवत प्राणप्रतिष्ठापण सोहळा जलौषात साजरा
कोलाड - श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील चणेरे पंचक्रोशीतील खैराळे येथे शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी नववर्षाच्या प्रथमदिनी व मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून गंभे परिवार कुलदैवत प्राणप्रतिष्ठापण सोहळा जलौषात साजरा झाला.खैराळे गावचे गंभे कुटुंब गावातील व पंचक्रोशीतील सर्वात मोठे कुटूंब तब्बल ६९ उंबऱ्यांचे.कुलदैवताचे भक्त श्री. चंद्रकांत दामोदर गंभे यांच्या शुभहस्ते जागृत देवस्थान खंडोबा, काळ भैरव, चेडोबा यांची प्राणप्रतिष्ठा पूजा स्थापना मोठ्या उत्साह व आनंददायी वातावरणात करण्यात आली .
ऐतिहासिक वारसा असलेल्या भैरी आई, भवानी आई, या देवी देवतांची ओटी खणा नारळानी मुकुंद गंभे-मंदा गंभे व गोपीनाथ गंभे-दमयंती गंभे यांच्या हस्ते भरण्यात आली.विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी गंभे परिवार व गावातील सकपाळ,तांबे, सावंत, आयरे,खेरटकर,मयेकर, मांडवकर कुटुंबातील माहेरवाशीनी महिला वर्ग रंगीबेरंगीत नऊवारी साड्या परिधान करून व पुरुषवर्ग पारंपरिक वेष परिधान करुन उपस्थित होते.
हाती वैष्णव ध्वजा घेऊन अबालवृध्द भव्यदिव्य, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन मिरवणूकीमध्ये सामील झाले.
जितू गंभे यांच्या हस्ते गोंधळ जागरण,अजय गंभे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा, हरिपाठ, कीर्तन असें विविध धार्मिक आणि आध्यत्मिक कार्यक्रम होमहवन,कळस पूजन, प्राणप्रतिष्ठा,महाआरती इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
यावेळी देवीचा दुपारी व रात्री दोन्ही वेळेचं भंडारा देखील ठेवण्यात आला होता व त्या भंडाऱ्यास कुटुंबातील अनेक दानशूर व्यक्तिंनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.तसेच देवीच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने व परिसर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.
ह्या सोहळ्यात गावचे ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चणेरे पंचक्रोशीतील विशेष मान्यवर, कुणबी समाजोन्नती संघ अध्यक्ष अशोक सानप,खजिनदार परशुराम आंब्रे,समाजसेवक पांडुरंग कोंडे ,गोविंद कोंडे ,गिजे भाऊसाहेब काशीनाथ भोईर, अनेक समाजबांधव कृष्णा पवार ,रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र म. सकपाळ,गावातील उपसरपंच मधुकर सावंत,गाव कमिटीअध्यक्ष नरेंद्र म. सकपाळ, सचिव प्रमोद गंभे, खजिनदार शैलेश गंभे,पदाधिकारी खेळू खेरटकर,दिनेश सकपाळ,अनंत सकपाळ ,युवा कार्यकर्ते दत्ताराम सकपाळ ,शैलेश सकपाळ ,महादेव सावंत ,बाळाराम सावंत ,प्रकाश सकपाळ,चंद्रकांत सकपाळ इत्यादी सदस्य तसेच मुंबईहून सदर कार्यक्रमासाठी आवर्जून मुबंई मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मयेकर व अनेक सदस्य उपस्थित होते.
उत्स्फूर्तपणे भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्याचे व मान्यवरांचे गंभे परिवारांच्यावतीने पुष्पगुच्छ, शाल- श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला. प्रत्येक उपक्रम हाती घेऊन तो यशस्वी करण्यासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या गोपीनाथ गंभे, मुकुंद गंभे ,यशवंत गंभे ,राम गंभे ,शरद गंभे, महेश गंभे ,विवेक गंभे, हेमंत गंभे, शशी गंभे,भगवान गंभे, रामचंद धो गंभे, संतोष गंभे, अजय गंभे, विनू गंभे,विजय गंभे, गौरव गंभे , रामचंद्र म.गंभे, अनिल गंभे, सुरेश गंभे, जितू गंभे, राजू गंभे, जयेंद्र गंभे, प्रणल गंभे व मुबंई मंडळाचे सर्व पदाधिकारी, आदर्श मंडळाचे सर्व पदाधिकारी गंभे परिवार ,ग्रामस्थ व महिला मंडळाचे बहुमुल्य सहकार्य लाभले.
यावेळी किशोर गंभे यांनी सूत्रसंचालन केले.उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे त्यांनी आभार मानले. हरिपाठ ,कीर्तन,जागर,भजन इत्यादी कार्यक्रमाचा आनंद घेत ह्या एक दिवसीय सोहळ्याची सांगता झाली.खैराळे गावातील गंभे परिवाराचा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा अविस्मरणीय सोहळा, "न भुतो न भविष्यती" असा होता.
सोहळ्यातील मिरवणूकीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
खरोखर आभार मानण्यासारख आहे जबरदस्त हा सोहला माझ्या कुलदैवताचे येल कोट येल कोट जय मल्हार 🙏💐 गंभे परिवार खुपच छान 🙏🙏💐
ReplyDelete