सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
रोहा-सचिन साळूंखे
भारत सरकार युवा खेल मंत्रालय यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार प्राप्त असलेली संघटना सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान या संघटनेचा 12 जानेवारी २०२२ रोजी पाचवा वर्धापन दिन रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाला. वर्धापन दिन कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिनास रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रदिप उर्फ आप्पा देशमुख,अमित घाग (भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ), सलाम रायगड चे संपादक, तरुणांचे मार्गदर्शक राजेन्द्र जाधव, संपादक सचिन साळुंखे, पत्रकार जितेंद्र जाधव, महेश मोहिते, पत्रकार तथा आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे , विजय खेरटकर यांसह अनेक मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी मान्यवरांचे हस्ते सुराज्यच्या वेबसाईटचे उद्धघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद व जिजाऊ माँसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. थोर समाजसेविका,अनाथांची माय सिंधूताई सपकाळ ह्यांना आदरांजली वाहण्यात आली. भारत सरकारच्यावतीने युथ संमेलन आयोजन करण्यात आले होते.सदर युथ संमेलनाला ऑनलाईन पद्धतीने सुराज्य टीम जोडली गेली. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील युवकांना संबोधित केले.
प्रास्ताविकात रोशन चाफेकर यांनी सुराज्यच्या 5 वर्षाचा कार्यकाळ कथन केला.झालेला संघर्ष,आलेले चांगले-वाईट अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली.
अमित घाग यांनी आपल्या मनोगतामध्ये सुराज्य ला शुभेच्छा देत असताना कामगारांच्या प्रश्नावर तसेच तालुक्यातील आरोग्य विषयावर, सुराज्यातील युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केलं. व सुराज्याला शुभेच्छा दिल्या. तसेच रोजगार निर्मितीसाठी बंद पडलेले कारखाने पुन्हा सूरू करून, पुन्हा नवे कारखाने उभे राहिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असेही ते शेवटी म्हणाले.
पत्रकार राजेंद्र जाधव म्हणाले की,युवकांनी जास्तीत जास्त वाचन करावे , जिथे अन्याय असेल तिथे युवकांनी आवाज उठवायला पाहिजे.इतिहास विज्ञानाचा अभ्यास करण्याचे आवाहन ही त्यांनी तरुणांना केले.
आई आणि गाईचे महत्व सांगत आई वडिलांचे महत्व सांगत त्यांचा सांभाळ करण्याचे आवाहन ही त्यांनी शेवटी केले.
वर्धापन दिनानिमित्त हाजी कोठारी ( सचिव ), अभिजीत भोसले (उपाध्यक्ष ),विनीत वाकडे (सहसचिव),रोहा तालुका अध्यक्ष सुमित खरात, रोहा शहर अध्यक्ष वेदांत देशमुख, व अन्य पदाधकाऱ्यांचीही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती खेरटकर व तुषार दिघे यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते सुराज्यचे संकेत देसाई, प्रसाद पाटुकले,मंथन भोईर, रोहित सिंघ, श्रेयस सोनावणे,परेश चितळकर,अनय बारस्कर, रिया कासार, आदर्श गायकवाड, प्रिया जंगम यांचा सत्कार करण्यात आला.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा👇👇
Comments
Post a Comment